मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit sharma century : तीन वर्षांनंतर रोहित शर्माचं शतक, रिकी पाँटिंगची बरोबरी केली

Rohit sharma century : तीन वर्षांनंतर रोहित शर्माचं शतक, रिकी पाँटिंगची बरोबरी केली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 24, 2023 03:20 PM IST

Rohit sharma century vs new zeland : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूर येथे खेळवला जात आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rohit sharma century vs new zeland
Rohit sharma century vs new zeland

India Vs New Zealand 3rd ODI Match Today : इंदूर वनडेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शतक ठोकले आहे. त्याने ८१ चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने आतापर्यंत ९ चौकार आणि ६ षटकार ठोकले आहेत. 

या शतकासह त्याने रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. रोहित आणि पाँटिंग या दोघांनी वनडेमध्ये ३० शतके झळकावली आहेत.

वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके

• सचिन तेंडुलकर - ४६३ सामने, ४९ शतके

• विराट कोहली - २६८ सामने, ४६ शतके

• रोहित शर्मा - २३८ सामने, ३० शतके

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

• सचिन तेंडुलकर - ४६३ सामने, ४९ शतके

• विराट कोहली - २६८ सामने, ४६ शतके

• रिकी पाँटिंग - ३७५ सामने, ३० शतके

• रोहित शर्मा - २३८ सामने, ३० शतके

• सनथ जयसूर्या - ४४५ सामने, २८ शतके

दरम्यान, शतकानंतर रोहित शर्मा बाद होऊन तंबूत परतला आहे. २१२ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा शतकी खेळी करून बाद झाला. रोहितने ८५ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याला मायकल ब्रेसवेलने क्लीन बोल्ड केले. रोहितच्या बॅटमधून ९ चौकार आणि ६ षटकार निघाले.

दुसरा सलामीवीर शुभमन गिलही शतकानंतर तंबूत परतला. २३० धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल ७८ चेंडूत ११२ धावा करून बाद झाला. ब्लेअर टिकनरने त्याला डेव्हन कॉनवेकरवी झेलबाद केले. गिलने १३ चौकार आणि ५ षटकार मारले. आता इशान किशन विराट कोहलीसोबत क्रीजवर आहे. हे वृत्त लिहिपर्यंत भारताची धावसंख्या २९ षटकांत २ बाद २३१ अशी आहे.

WhatsApp channel