मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: रोहित शर्माचं शतक थोडक्यात हुकलं, मधुशंकाच्या चेंडूनं हिटमॅनला चकवलं
Rohit Sharma century misses
Rohit Sharma century misses

Rohit Sharma: रोहित शर्माचं शतक थोडक्यात हुकलं, मधुशंकाच्या चेंडूनं हिटमॅनला चकवलं

10 January 2023, 15:33 ISTRohit Bibhishan Jetnavare

Rohit Sharma century misses: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे शतक थोडक्यात हुकले आहे. तो ८३ धावांवर बाद झाला. त्याला दिलशान मधुशंकाने बोल्ड केले.

India vs Sri Lanka (IND vs SL) 1st ODI: भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल दोघेही चांगल्या टचमध्ये होत्या. मात्र, या दरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माचे शतक थोडक्या हुकले आहे. रोहित ६७ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याला दिलशान मदुशंकाने त्रिफळचीत केले. 

हे वृत्त लिहिपर्यंत भारताच्या २५ षटकात २ बाद १८५ धावा झाल्या आहेत. विराट कोहली २४ आणि श्रेयस अय्यर ६ धावांवर फलंदाजी करत आहेत.

तत्पूर्वी, शुभमन आणि रोहितने वेगवान सुरुवात केली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १९.१ षटाकत १४३ धावा जोडल्या.  त्यानंतर १४३ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. शुभमन गिल ६० चेंडूत ७० धावा करून बाद झाला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. गिलने आपल्या खेळीत ११ चौकार मारले.

दोन्ही संघ

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन:

पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (wk), धनंजया डी सिल्वा, चारिथ असालंका, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसून रजिथा, दिलशान मदुशंका