Rohit Sharma नं धोनीचा मोठा विक्रम मोडला! हिटमॅन सचिन-द्रविडच्या क्लबमध्ये सामील
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने ४२७ डावात हा पराक्रम करत धोनीला मागे टाकले आहे. धोनीने ४८३ डावात १६ हजार धावा केल्या होत्या.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यात ३३ धावांची धमाकेदार खेळी केली. हिटमॅनने १६ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने या धावा ठोकल्या. विंडीजविरुद्धच्या या खेळीच्या जोरावर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
रोहितने सर्वात कमी डावात १६ हजार धावा करण्याच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८३ डावांमध्ये १६ हजार धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माने ४२७ डावांमध्ये हा पराक्रम करत त्याला मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६ हजार धावा करणारे भारतीय खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६ हजार धावा करण्याचा मान विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघ्या ३५० डावात १६ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याच्या मागे सचिन तेंडुलकर, द वॉल राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांचा नंबर आहे.
३५०- विराट कोहली
३७६ - सचिन तेंडुलकर
३८७- राहुल द्रविड
४०२- वीरेंद्र सेहवाग
४२४- सौरव गांगुली
४२७ - रोहित शर्मा*
४८३- एमएस धोनी
भारताची मालिकेत मालिकेत ३-१ अशी आघाडी-
दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून १९१ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत १३२ धावांत गारद झाला. भारताकडून आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बाश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर अर्शदीप सिंगने १२ धावांत ३ बळी घेतले. भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकून मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.