मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC : रोहित शर्माच्या फॉर्मकडे तूर्त दुर्लक्ष करा; संजय मांजरेकर असं का म्हणाला?

WTC : रोहित शर्माच्या फॉर्मकडे तूर्त दुर्लक्ष करा; संजय मांजरेकर असं का म्हणाला?

Jun 02, 2023 12:18 PM IST

WTC Final and Rohit Sharma : जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त होत असताना संजय मांजरेकर यांनी मोठं विधान केलं आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

Sanjay Majrekar on Rohit Sharma : आयपीएल संपल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे वेध लागले आहेत. टीम इंडियाला मात्र रोहित शर्माच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. आयपीएलमध्ये पुरता फ्लॉप ठरलेला रोहित शर्मा डब्लूटीसीमध्ये खेळेल का, असा प्रश्न संघ व्यवस्थापनाला पडला आहे. माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यानं याबद्दल अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.

भारताचा डब्लूटीसीमधील अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ जूनपासून होणार आहे. हा सामना भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे. टीम इंडियाला सर्वच खेळाडूंकडून अपेक्षा आहेत. रोहितनं आयपीएल २०२३ मध्ये १६ सामन्यांमध्ये २०.७५ च्या सरासरीनं अवघ्या ३३२ धावा केल्या. त्यामुळं रोहितच्या फलंदाजीच्या फॉर्मची चिंता भेडसावू लागली आहे. मात्र, याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही, असं मांजरेकर यानं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका क्रीडाविषयक वृत्तवाहिनीशी बोलताना मांजरेकर म्हणाला, रोहितसाठी कसोटी क्रिकेट हा सर्वात थरारक फॉरमॅट आहे. त्यामुळं डब्ल्यूटीसी फायनलच्या आधी त्याच्या फॉर्मकडं दुर्लक्ष करावं. आयपीएलच्या कामगिरीवरून कुठलाही अंदाज बांधू नये, असं मांजरेकर यानं म्हटलं आहे.

'रोहित शर्मा मागील आयपीएलमध्ये चांगला खेळला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आम्ही त्यानं उत्तम फलंदाजी केली. त्यामुळं त्याच्या एकूण कामगिरीला आयपीएलशी जोडून पाहिलं जाऊ नये. रोहित शर्मा कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथं कसोटी क्रिकेट हा त्याच्यासाठी सर्वात थरारक फॉरमॅट आहे. विराट कोहलीचंही तसंच आहे, असं मांजरेकर म्हणाला.

'कसोटी क्रिकेटमधील रोहितची फलंदाजी तांत्रिकदृष्ट्या जवळपास अचूक झाली आहे. मात्र एका ठिकाणी तो अडखळतो. पुल शॉट त्याचा आवडता आहे. बॉलरनं आखूड टप्प्याचा चेंडू टाकला की तो सीमारेषेबाहेर फेकून देतो. मात्र, गेल्या काही काळापासून त्याचा हा फटका फसतोय. अनेक वेळा तो पुल शॉट्स खेळताना बाद होतो. प्रतिस्पर्ध्यांनी आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आणि विशिष्ट ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवला की रोहित फसतो, असं मांजरेकर म्हणाला.

WhatsApp channel