मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात मोठा ‘भोपळावीर’; यावेळी काय करणार?

IPL 2023 : रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात मोठा ‘भोपळावीर’; यावेळी काय करणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 28, 2023 01:54 PM IST

Rohit Sharma in IPL : आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स व कर्णधार रोहित शर्मा याच्या कामगिरीची सध्या जोरदार चर्चा आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

IPL 2023 : जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेला आयपीएलचा १६ वा सीझन येत्या ३१ मार्चपासून सुरू होत आहे. त्या निमित्तानं विविध संघ व त्यांच्या कर्णधारांच्या बलस्थानांची व कमकुवत दुव्यांची चर्चा सुरू आहे. त्यातही मुंबई इंडियन्स व रोहित शर्माची चर्चा सर्वाधिक आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा संघ २ एप्रिल रोजी पहिला सामना खेळणार आहे. मुंबईचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (आरसीबी) होणार आहे. आयपीएलमधील यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या रोहित शर्मा याच्याकडून मुंबईला पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, हाच यशस्वी फलंदाज आयपीएलमधील सर्वात मोठा 'शून्यवीर' असून या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे.

रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, सर्वाधिक वेळा शून्य धावा करणाऱ्यांच्या यादीतही रोहित आघाडीवर आहे. मनदीप सिंग हा खेळाडूही त्याच्यासोबत पहिल्या स्थानावर आहे. रोहित आणि मनदीप सिंग हे दोघे आयपीएलमध्ये प्रत्येकी १४ वेळा भोपळाही न फोडता तंबूत परतले आहेत. रोहित आयपीएलमध्ये एकूण २२७ सामने खेळला असून त्यानं ३०.३० च्या सरासरीनं ५,८७९ धावा केल्या आहेत. त्याचवेळी मनदीपनं १०८ सामन्यांत २१.४२ च्या सरासरीनं १,६९२ धावा केल्या आहेत.

कार्तिक आणि रायडूचंही नाव

शून्यवीरांच्या या लाजिरवाण्या यादीत दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडूसारख्या खेळाडूंचीही नावं आहेत. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज कार्तिक आणि रायडू हे आयपीएलमध्ये प्रत्येकी १३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. कार्तिक आणि रायुडू व्यतिरिक्त हरभजन सिंग, पियुष चावला, पार्थिव पटेल आणि अजिंक्य रहाणे देखील अनेक वेळा शून्यावर बाद झाले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या विदेशी खेळाडूंमध्ये राशिद खान, सुनील नरेन आणि ग्लेन मॅक्सवेलचा समावेश आहे. या तिघांना १२ वेळा खातंही न उघडता तंबूत परतावं लागलं आहे.

WhatsApp channel

विभाग