मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: एवढे मोठे गाल! रडणाऱ्या मुलाला रोहितनं 'असं' शांत केलं, एकदा बघाच
Rohit Sharma India vs Sri Lanka
Rohit Sharma India vs Sri Lanka

Rohit Sharma: एवढे मोठे गाल! रडणाऱ्या मुलाला रोहितनं 'असं' शांत केलं, एकदा बघाच

10 January 2023, 12:49 ISTRohit Bibhishan Jetnavare

rohit sharma and guwahati kid video: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना आज गुवाहाटी येथे होणार आहे. याआधी, रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रडणाऱ्या मुलाला शांत करतो आणि त्याचे गाल ओढताना दिसत आहे.

Rohit Sharma India vs Sri Lanka: भारतीय संघ सध्या गुवाहाटीमध्ये आहे. या ठिकाणी श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना आज (१० जानेवारी) गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेसह कर्णधार रोहित शर्मा तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका मुलाचे गाल ओढताना दिसत आहे. हा मुलगा रोहितला भेटण्याची बराच वेळ पाहत होता, त्यादरम्यान तो रडतही होता. 

रोहितला पाहून मुलगा रडायला लागतो

वास्तविक, सामन्याच्या एक दिवस आधी सराव करताना ही घटना घडली. रोहित शर्मासह संपूर्ण संघ भारताच्या नेट सरावात घाम गाळत आहे. त्याच वेळी, सीमारेषेच्या दुसऱ्या बाजूला बरेच चाहते जमले होते, ज्यांना कर्णधार रोहित आणि इतर खेळाडूंना भेटायचे होते.

त्या दरम्यान, एक मुलगा रडायला लागतो, हे पाहून रोहित शर्मा त्याच्याकडे येतो. त्या मुलाने टीम इंडियाची जर्सी घातली होती. रोहित त्याच्याकडे आल्यावर तो मुलगा रडायचे थांबतो आणि काहीतरी बोलू लागतो. तेव्हा रोहित त्या मुलाला म्हणतो, 'का रडतोय... आणि इतके मोठे गाल आहेत!.' यानंतर रोहित त्या मुलासोबत फोटो काढतो आणि त्याला हसायला सांगतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून लोकही रोहितचे कौतुक करत आहेत. 

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा टी-20 मालिकेत २-१ असा पराभव केला आहे. आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. यातील पहिला सामना मंगळवारी गुवाहाटी येथे होणार आहे.