वेस्ट इंडिजमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला. डॉमिनिका येथे भारताने यजमान वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांनी पराभव केला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच खूश आहे.
वास्तविक, कॅप्टन रोहित शर्माने त्याच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केला आहे, ज्यामध्ये तो समुद्रकिनाऱ्यावर कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने एक मजेदार कॅप्शन लिहिले आहे. रोहितने कॅप्शनमध्ये बाजीगर चित्रपटाचा एक संवाद लिहिला आहे. त्याने लिहिले की, "अनारकली का फोन था। आईसक्रीम खाना बहुत जरूरी है।"
दरम्यान, आता रोहित शर्माचा हा फोटो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोवरुन चाहत्यांनी मीम्स बनवायला सुरुवात केली आहे.
विंडीज दौऱ्यावर रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याने यशस्वी जैस्वालसोबत पहिल्या विकेटसाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी केली. रोहित शर्माचे कसोटी क्रिकेटमधील हे १०वे शतक होते. त्याचवेळी यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्या कसोटीत १७१ धावांची खेळी करताना विक्रमांचा पाऊस पाडला.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ५ बळी घेतले. भारताने पहिला डाव ५ विकेट गमावून ४२१ धावा करून घोषित केला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा डाव १३० धावांवर आटोपला. अश्विनने ७ विकेट घेतल्या. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात एकूण १२ विकेट घेतल्या होत्या.
संबंधित बातम्या