मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma Birthday: रोहित शर्माला चाहत्यांचं बर्थडे गिफ्ट, रस्त्यावर उभारणार ६० फुटांचा कटआऊट, कधी-कुठे, कसे? पाहा

Rohit Sharma Birthday: रोहित शर्माला चाहत्यांचं बर्थडे गिफ्ट, रस्त्यावर उभारणार ६० फुटांचा कटआऊट, कधी-कुठे, कसे? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 29, 2023 03:50 PM IST

Rohit Sharma Cutout : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचा वाढदिवस (Rohit Sharma birthday) ३० एप्रिलला आहे. यामुळे रोहित शर्माच्या एका चाहत्याने हैदराबादमध्ये (Rohit Sharma Cutout in Hyderabad) त्याचा ६० फूट उंच कटआउट बनवला आहे.

Rohit Sharma Cutout in Hyderabad
Rohit Sharma Cutout in Hyderabad

60ft Cutout for Rohit Sharma in Hyderabad : भारतीय क्रिकेट संघ (TEAM INDIA )आणि आयपीएलमधील (IPL 2023) मुंबई इंडियन्सचा (mumbai indians) कर्णधार रोहित शर्मा ३० एप्रिल रोजी ३६ वर्षांचा होणार आहे. या दरम्यान रोहित शर्माच्या एका चाहत्याने हैदराबादमध्ये त्याचा ६० फूट उंच कटआउट (Rohit Sharma Cutout) बनवला आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील कोणत्याही क्रिकेटपटूचा हा सर्वात मोठा कटआउट आहे. या कटआटचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

क्रिकेटपटूंसाठी अशा गोष्टी दुर्मिळ आहेत. कधी त्यांचे चाहते सचिन तेंडुलकरसाठी अशा अनोख्या गोष्टी करताना दिसले आहेत तर कधी महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांनीही त्याच्या बर्थडेला असेच काहीतरी केले होते.

रोहित शर्माच्या फॅनने बनवला ६० फूट लांब कटआउट

हैदराबादमध्ये राहणाऱ्या रोहित शर्माच्या या चाहत्याने त्याच्या आवडत्या क्रिकेटरचा ६० फूट लांब कटआउट बनवला आहे. तथापि, या कटआउटचे अनावरण ३० एप्रिल रोजी म्हणजेच रोहित शर्माच्या वाढदिवसादिवशी होणार आहे. 

हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवर हे (RTC X Roads) कटआउट बसवले जाईल. चाहते हा मेगा इव्हेंट म्हणून साजरा करतील. प्रथम कटआउटचे ओपनिंग होईल. त्यानंतर केक कापला जाईल आणि चाहते डीजेवर सेलिब्रेशन करतील.

आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूचा एवढा मोठा कटआऊट झालेला नाही. अशाप्रकारे, रोहित शर्माचा हा ६० फूट उंच कटआउट क्रिकेटपटूचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कटआउट आहे.

दरम्यान, रोहित शर्मा आयपीएलमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे ३० एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सला भिडताना दिसणार आहे.

मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर

दरम्यान, संध्या आयपीएल 2023 चा थरार सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी ही स्पर्धा आतापर्यंततरी चांगली राहिली नाही. या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत, ज्यात फक्त ३ विजय मिळवले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या