Rishabh Pant Video : ऋषभ पंतने हे काय शेअर केलं? हा व्हिडीओ पाहा मन खुश होऊन जाईल!
kl rahul shreyas iyer fitness update : ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. पंतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर आणि केएल राहुल फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत.
rishabh pant share video kl rahul and shreyas iyer batting : आशिया कप 2023 च्या आधी टीम इंडियासाठी एक नाही तर दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत. टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी ऋषभ पंतने दिली आहे. पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यर आणि केएल राहुल पूर्ण लयीत फलंदाजी करताना दिसत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
पंतने शेअर केला मन खुश करणारा व्हिडिओ
वास्तविक, ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. पंतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर आणि केएल राहुल फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. अय्यर आणि राहुल पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहेत आणि लयीत फलंदाजी करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, "बर्याच दिवसांनी लाईव्ह क्रिकेट मॅच पाहण्यात मजा आली."
अय्यर बराच काळ क्रिकेटपासून दूर
श्रेयस अय्यरने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळला होता. मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात अय्यर पाठीच्या समस्येशी झुंजताना दिसला आणि फलंदाजीला आला नाही. पाठीच्या सततच्या त्रासामुळे अय्यरवर शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यामुळे तो आयपीएल २०२३ मध्येही सहभागी होऊ शकला नाही.
राहुलने दिले फिटनेस अपडेट
केएल राहुलने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजी आणि विकेटकीपिंगचा सराव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राहुल पूर्णपणे फिट दिसत होता. केएल राहुलला आयपीएल 2023 दरम्यान दुखापत झाली होती, ज्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला मुकला होता. आता राहुल आणि श्रेयस अय्यर फिट दिसत आहेत.