मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant धोनीच्या पुढे, परदेशी पिचवर ठरतोय धोकादायक, पाहा थक्क करणारे आकडे

Rishabh Pant धोनीच्या पुढे, परदेशी पिचवर ठरतोय धोकादायक, पाहा थक्क करणारे आकडे

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 18, 2022 02:42 PM IST

पंत पुन्हा एकदा परदेशी भूमीवर सर्वात धोकादायक भारतीय विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. या शतकानंतर पंतने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

dhoni and pant
dhoni and pant

भारताने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. भारताने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात ४२.१ षटकात पूर्ण केले. भारताकडून रिषभ पंतने शानदार शतक ठोकले त्याने ११३ चेंडूत १२५ धावांची खेळी केली. त्याने १६ चौकार आणि २ षटकार ठोकले. तसेच, हार्दिक पांड्यानेही दमदार ७१ धावा ठोकल्या.  तिसरा सामना रविवारी (१७ जुलै) मँचेस्टरमध्ये खेळला गेला.

 पंत पुन्हा एकदा परदेशी भूमीवर सर्वात घातक भारतीय विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. या शतकानंतर पंतने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

परदेशी भूमीवर वनडे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना शतक ठोकण्याचा विक्रम फक्त धोनीच्या नावावर होता. धोनीने ७ जानेवारी २०१० रोजी मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध हे शतक केले होते. त्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला होता. पण आता पंतने धोनीची बरोबरी केली आहे.

आशियाबाहेर धावांचा पाठलाग करताना शतक ठोकणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज-

रिषभ पंत हा आशियाबाहेर धावांचा पाठलाग करताना शतक ठोकणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. याशिवाय पंत हा परदेशी भूमीवर वनडे सामन्यात पाठलाग करतानाही सर्वाधिक धावा करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. धोनीने बांगलादेशविरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. तर पंतने आता नाबाद १२५ धावा केल्या आहेत.

एमएस धोनी - मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध शतक (७ जुलै २०१०).

रिषभ पंत - मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध शतक (१७ जुलै २०२२).

परदेशात सर्वात धोकादायक भारतीय यष्टीरक्षक-

परदेशातील धोकादायक भारतीय यष्टीरक्षकाबद्दल बोलायचे झाले तर या बाबतीत रिषभ पंत अव्वल आहे. त्याने आतापर्यंत परदेशी भूमीवर सर्वाधिक ५ शतके झळकावली आहेत. त्याच्या आसपास कोणीही नाही. धोनीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने २ शतके झळकावली होती.

परदेशी भूमीवर सर्वाधिक शतके करणारा भारतीय यष्टीरक्षक

रिषभ पंत - ५ शतके

एमएस धोनी - २ शतके

विजय मांजरेकर - १ शतक

केएल राहुल - १ शतक

अजय रात्रा - १ शतक

ऋद्धिमान साहा - १ शतक

WhatsApp channel