मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant: मिर्झापूरची गादी, गर्लफ्रेंड अन् सोशल मीडियाचा मुन्ना भैय्या

Rishabh Pant: मिर्झापूरची गादी, गर्लफ्रेंड अन् सोशल मीडियाचा मुन्ना भैय्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 20, 2022 04:53 PM IST

पंत त्याच्या बिंदास शैलीसाठी ओळखला जातो. त्याने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, "'और हम एक नया नियम अॅड कर रहे हैं। मिर्जापुर की गद्दी पे बैठने वाला कभी भी नियम बदल सकता है- मुन्ना भैया." हे कॅप्शन मिर्झापूर मधला डायलॉग आहे.

rishabh pant
rishabh pant

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धचा निर्णायक सामना जिंकवून दिला. त्याने इंग्लंड दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली. त्यामुळे सध्या रिषभ पंतची प्रचंड चर्चा आहे. सोशल मीडियावरही पंत सध्या चर्चेत आला आहे. मिर्झापूर या प्रसिद्ध वेब सीरिजचा एक डायलॉग कॅप्शनमध्ये लिहित त्याने त्याचा फोटो शेअर केला आहे.

पंत त्याच्या बिंदास शैलीसाठी ओळखला जातो. त्याने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, "'और हम एक नया नियम अॅड कर रहे हैं। मिर्जापुर की गद्दी पे बैठने वाला कभी भी नियम बदल सकता है- मुन्ना भैया." हे कॅप्शन मिर्झापूर मधला डायलॉग आहे.

<p>rishabh pant&nbsp;</p>
rishabh pant&nbsp; (social media)

 

यावर मिर्झापूर वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता दिव्येंदू शर्माने कमेंट केली आहे. त्याचवेळी इन्स्टाग्रामवर पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी हिची देखील कमेंट व्हायरल झाली आहे.

दिव्येंदू शर्माने कमेंटमध्ये लिहिले की, “आप योग्य है.” यावर पंतनेही त्याला प्रत्युत्तर दिले. त्याने लिहिले, “नही मुन्ना भैया ये गद्दी आप की ही है.”

त्यानंतर दिव्येंदूने पंतला शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, “असाच चमकत राहा.”

<p>rishabh pant</p>
rishabh pant

तर रिषभची गर्लफ्रेंड ईशा नेगीने लिहिले की ‘Nokia 1100’. सोबतच आगीचे इमोजी पोस्ट केले आहेत. या कमेंटला दोन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. पंत आणि ईशा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ईशा अनेक सामन्यांमध्ये पंतला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये आलेली दिसली आहे.

WhatsApp channel