मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final 2023 : टीम इंडियाचे हे दोन फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरणार, रिकी पॉँटिंगची भविष्यवाणी

WTC Final 2023 : टीम इंडियाचे हे दोन फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरणार, रिकी पॉँटिंगची भविष्यवाणी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 01, 2023 09:55 PM IST

ind vs aus WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि माजी क्रिकेटर रिकी पाँटिंगने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताचे कोणते फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरू शकतात हे पाँटिंगने सांगितले आहे.

ind vs aus WTC Final 2023
ind vs aus WTC Final 2023

ricky ponting on WTC Final : WTC Final 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून रंगणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. WTC Final जिंकून भारतीय संघ पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, तसे पाहता इंग्लिश कंडिशन्समध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणे टीम इंडियासाठी सोपे असणार नाही.

कसोटी क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे.

दरम्यान, अशातच ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि माजी क्रिकेटर रिकी पाँटिंगने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताचे कोणते फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरू शकतात हे पाँटिंगने सांगितले आहे.

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू असतील, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने म्हटले आहे. पुजाराचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने कांगारूंविरुद्ध इतर कोणत्याही संघापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ३५ वर्षीय पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २४ कसोटीत ५ शतकांच्या मदतीने २०३३ धावा केल्या आहेत.

कोहलीचे आकडे काय सांगतात?

विराट कोहलीचाही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी रेकॉर्ड मजबूत आहे. कोहलीने कांगारू संघाविरुद्ध २४ कसोटीत १९७९ धावा केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत, कोहलीने १८६ धावा केल्या होत्या, जो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या आहे.

रिकी पाँटिंग नेमकं काय म्हणाला?

कोहली-पुजारा हे भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज असतील आणि ऑस्ट्रेलियाला या दोघांना लवकर बाद करण्याची योजना आखावी लागेल, असे पाँटिंगने सांगितले. आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये पाँटिंग म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियन संघ विराट कोहलीबद्दल बोलत आहे. तो पुजाराबद्दलही बोलत आहे. पुजारा यापूर्वीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध धोकादायक ठरला असून इंग्लंडमधील खेळपट्टी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांप्रमाणेच वागेल. पुजाराला लवकर बाद करावे लागणार हे कांगारू गोलंदाजांना माहीत आहे.

विराट कोहली पाँटिंगला काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने खुलासा केला की, कोहलीने त्याला सांगितले आहे की, तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. पाँटिंग म्हणाला, “ऑस्ट्रेलियाला माहित आहे की विराट कोहली कदाचित गेल्या काही आठवड्यांमध्ये त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला आहे. तसे, त्याने टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने मला सांगितले की तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला आहे आणि WTC Final आधी ऑस्ट्रेलियासाठी हा एक कडक इशारा आहे.

WhatsApp channel