पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये जगातील १०,५०० खेळाडू सहभागी झाले आहेत. ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र होण्यासाठी खेळाडूंना प्रचंड मेहनत करावी लागते. अनेकजण अत्यंत गरिबीतून इथपर्यंत पोहोचलेले असतात, तर काहींना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिक खेळण्याचे आणि पदक जिंकण्याचे भाग्य मिळते.
पण पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये एक संघ कोट्याधीश खेळाडूंनी भरलेला आहे. या खेळाडूंना वाटले तर तर ते आकाशातून कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडू शकतात.
एनबीए (NBA) ही कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी स्पोर्ट्स लीग आहे, हे कोणापासूनही लपलेले नाही. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये लेबरोन जेम्स (LeBron James) याच्याकडे अमेरिकेच्या बास्केटबॉल संघाचे नेतृत्व आहे. जेम्स लेबरॉनची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून तुम्ही थक्क व्हाल.
एनबीएमधून वर्षाला करोडो रुपये कमावणाऱ्या या टीममध्ये स्टीफन करी देखील आहे. लेब्रॉन जेम्सच्या नेट वर्थने २०२२ मध्ये १ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता.
यूएसए संघातील सर्वात तरुण खेळाडू अँथनी एडवर्ड्स आहे, ज्याची एकूण संपत्ती वयाच्या २२ व्या वर्षी ४० मिलियन्स अमेरिकन डॉलर्सच्या पुढे आहे. जर आपण त्याचे भारतीय चलनात रूपांतर केले तर ही रक्कम ३३४ कोटी रुपये म्हणजेच ३.३ अब्ज रुपये इतकी आहे.
लेब्रॉन जेम्स हा जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहेत, ज्याची एकूण संपत्ती भारतीय चलनात १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. केविन ड्युरंट हा जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे, ज्याची एकूण संपत्ती सुमारे अडीच हजार कोटी रुपये आहे.
यूएसए बास्केटबॉल संघातील सर्व खेळाडू NBA मध्ये खेळतात, जिथून ते वर्षाला करोडो रुपये कमावतात. त्यामुळे या संघाचा प्रत्येक खेळाडू करोडपती आहे. १९३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांमध्ये बास्केटबॉलचा समावेश करण्यात आला होता, त्यानंतर यूएसए संघाने १६ वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. या बास्केटबॉल संघाने ऑलिम्पिकमध्ये १६ सुवर्णांसह एकूण १९ पदके जिंकली आहेत.
संबंधित बातम्या