Sunil Chhetri : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली, सुनील छेत्री असा बनला भारताचा पोस्टर बॉय
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sunil Chhetri : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली, सुनील छेत्री असा बनला भारताचा पोस्टर बॉय

Sunil Chhetri : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली, सुनील छेत्री असा बनला भारताचा पोस्टर बॉय

Jun 07, 2024 02:27 PM IST

Sunil Chhetri Retired : सुनील छेत्रीचे सैनिक वडील खारगा छेत्री यांना त्यांच्या मुलाने प्रोफेशनल फुटबॉलपटू व्हावे, असे वाटायचे आणि ते जे स्वत:च्या आयुष्यात करू शकले नव्हते ते साध्य करावे अशी नेहमीच त्यांची इच्छा होती.

Sunil Chhetri : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली, सुनील छेत्री असा बनला भारताचा पोस्टर बॉय
Sunil Chhetri : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली, सुनील छेत्री असा बनला भारताचा पोस्टर बॉय

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. गुरुवारी (६ जून) कुवेतविरुद्धचा फिफा विश्वचषक पात्रता सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना गोलशून्य बरोबरीत संपला.

चांगल्या कॉलेजात प्रवेशासाठी फुटबॉलची निवड

भारताच्या महान खेळाडूंपैकी एक असलेला छेत्री लहानपणी खूप खोडकर होता. त्याला लहानपणी फुटबॉलची आवड नव्हती, फक्त चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठीच त्याने हा खेळ निवडला होता, पण नशिबात काही वेगळेच लिहिले होते. स्वत: छेत्रीलाही कळू शकले नाही की फुटबॉल हा त्याच्या कमाईचा स्रोत आणि आयुष्य कधी बनले.

सनील छेत्रीचे सैनिक वडील खारगा छेत्री यांना त्यांच्या मुलाने प्रोफेशनल फुटबॉलपटू व्हावे, असे वाटायचे आणि ते जे स्वत:च्या आयुष्यात करू शकले नव्हते ते साध्य करावे अशी नेहमीच त्यांची इच्छा होती.

सुनीलने दिल्लीत फुटबॉलची कला शिकण्यास सुरुवात केली आणि २००१-०२ मध्ये सिटी क्लबमध्ये प्रवेश केला. यानंतर तो २००२ मध्ये मोहन बागानसारख्या दिग्गज फुटबॉल क्लबमध्ये सामील झाला. त्यानंतर जे घडले त्याची भारतीय फुटबॉलच्या इतिहासात नोंद झाली आहे. जवळपास २० वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीनंतर छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण

भारतासाठी १५१ सामन्यांमध्ये सर्वाधिक ९४ गोल करणाऱ्या छेत्रीने भारतीय फुटबॉलचा केंद्रबिंदू असलेल्या कोलकातामध्ये खेळाला अलविदा केला. तो २००५ पर्यंत मोहन बागानसोबत राहिला आणि त्याने १८ सामन्यांत ८ गोल केले. यानंतर तो भारताच्या २० वर्षांखालील संघ आणि वरिष्ठ राष्ट्रीय संघात सामील झाला.

२००५ मध्ये पाकिस्तानच्या क्वेटा शहरात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. आता सुनील छेत्री जवळपास २ दशकांच्या कारकिर्दीनंतर निवृत्त झाला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा छेत्री सध्या चौथा खेळाडू आहे.

आंतरराष्ट्रीय गोलच्या बाबतीत त्याने लिओनेल मेस्सीशीही स्पर्धा केली होती. जेव्हा छेत्री आणि मेस्सीचे गोल ६० आणि ८० च्या दरम्यान होते, तेव्हा छेत्रीने मेस्सीला अगदी थोड्या काळासाठी का होईना मागे सोडले होते.

तथापि, छेत्रीने गेल्या काही वर्षांत फारसे गोल न केल्यामुळे आणि अर्जेंटिनातील फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर इतर मैत्रीपूर्ण सामने आणि स्पर्धा खेळल्यामुळे मेस्सी त्याच्यापेक्षा खूप पुढे गेला.

घरातूनच मिळलाा फुटबॉलचा वारसा

३ ऑगस्ट १९८४ रोजी आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद येथे जन्मलेल्या सुनील छेत्रीला फुटबॉलचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील भारतीय सैन्याकडून खेळले होते आणि आई सुशीला नेपाळच्या राष्ट्रीय संघाकडून खेळली होती.

तत्कालीन प्रशिक्षक बॉब हॉटन यांनी भाईचुंग भुतियाच्या निवृत्तीनंतर २०११ च्या आशियाई कपमध्ये सुनील छेत्रीकडे कर्णधारपद सोपवले. या अचानक आलेल्या जबाबदारीने त्याच्यात बदल घडवून आणला.

त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, त्याला सल्ला देण्यासाठी भुतियासारखे दिग्गज होते, परंतु निवृत्तीनंतर छेत्रीने स्वत: च्या बळावर नवीन उंची स्थापित केली.

क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धी मिळवून दिली

वर्षानुवर्षे अनेक प्रतिभावान फुटबॉलपटू जन्माला आले असले तरी दुसरा कोणी भाईचुंग भुतिया किंवा सुनील छेत्री नव्हता. मैदानावर अनेक विक्रम रचणाऱ्या छेत्रीने फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर केलेले निलंबन, तेथील अधिकारी आणि प्रशिक्षकांवरील लैंगिक छळाचे आरोप, भ्रष्टाचार आणि गटबाजी या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत.

भारतीय फुटबॉलमध्ये आपला उत्तराधिकारी दिसत नसल्याचे पाहून छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाढवण्यासाठी शाकाहारी झाला. शाकाहारी होण्याचा हा सल्ला छेत्रीला त्याचा मित्र विराट कोहलीने दिला होता. निळी जर्सी आणि केशरी आर्मबँड परिधान करून गेली दोन दशके देशासाठी गोल करणाऱ्या छेत्रीने क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे मोठे काम केले आहे. छेत्रीची शैली आणि कर्तृत्वामुळे विराट कोहलीही चाहता बनला. छेत्री आणि विराट अनेकदा एकमेकांसोबत दिसले होते. निवृत्तीनंतर छेत्रीची जागा कोणता खेळाडू घेणार हे पाहणे बाकी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या