मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB Vs DC Highlights : मानधनाच्या आरसीबीचा दारुण पराभव, दिल्लीच्या तारा नॉरीसचे ५ विकेट्स

RCB Vs DC Highlights : मानधनाच्या आरसीबीचा दारुण पराभव, दिल्लीच्या तारा नॉरीसचे ५ विकेट्स

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 05, 2023 02:33 PM IST

RCB W vs DC W Live Score WPL 2023 : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शानदार विजय मिळवला.

RCB W vs DC W Live Score
RCB W vs DC W Live Score

Live Score, RCB vs DC Womens Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. या सामन्यात RCB ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत २ बाद २२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६३ धावाच करू शकला.

WPL 2023 RCB W vs DC W Updates

दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय

दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमध्ये आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा ६० धावांनी पराभव केला. RCB संघ आता याच मैदानावर उद्या सोमवारी (६ मार्च) त्यांच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. मुंबईने पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, दिल्ली संघ मंगळवारी (७ मार्च) डीवाय पाटील स्टेडियमवर यूपी वॉरियर्सला भिडणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सकडून अमेरिकेची गोलंदाज तारा नॉरिसने पहिल्याच सामन्यात ५ विकेट घेतल्या. १८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर नॉरिसने हीदर नाइटला कर्णधार मेग लॅनिंगकडे झेलबाद केले. हा तिचा पाचवा विकेट होता. नाइटने २१ चेंडूत ३४ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले.

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय साफ चुकीचा ठरला. कारण दिल्लीने २० षटकांत २ बाद २२३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६३ धावाच करू शकला.

शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी दिल्लीसाठी शानदार कामगिरी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ९१ चेंडूत १६२ धावांची भागीदारी केली. शेफाली ४५ चेंडूत ८४ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले. कर्णधार मेग लॅनिंगने ४३ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. तिने १४ चौकार मारले. मारिजन कॅप १७ चेंडूत ३९ आणि जेमिमा रॉड्रिग्जने १५ चेंडूत २२ धावा केल्या. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत ६० धावांची नाबाद भागीदारी केली. आरसीबीकडून हेदर नाइटने दोन्ही विकेट घेतल्या.

आरसीबीच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर स्मृती मंधानाने संघासाठी सर्वाधिक ३५ धावा केल्या. हीदर नाइटने ३४, अॅलिस पॅरीने ३१ आणि मेगन शुटने नाबाद ३० धावा केल्या. सोफी डिव्हाईनने १४ धावांचे योगदान दिले. दिशा कासट नऊ, रिचा घोष आणि आशा शोभना प्रत्येकी दोन धावा करून बाद झाल्या. 

दिल्ली कॅपिटल्सकडून अमेरिकेच्या तारा नॉरिसने सर्वाधिक ५ बळी घेतले. एलिस कॅप्सीने दोन गडी बाद केले. शिखा पांडेला एक विकेट मिळाला.

RCB W vs DC W Live Score : आरसीबीला सातवा धक्का

शिखा पांडेने आरसीबीला सातवा धक्का दिला. तिने १४व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आशा शोभनाला बाद केले. आशाला तीन चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. राधा यादवने तिचा झेल घेतला.

RCB W vs DC W Live Score : आरसीबीला दुसरा धक्का

सातव्या षटकात आरसीबीला दुसरा धक्का बसला. तिसऱ्या चेंडूवर अॅलिस कॅप्सीने स्मृती मंधानाला बाद केले. मंधानाने २३ चेंडूत ३५ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. दिशा कसाट आणि एलिस पेरी क्रीजवर आहेत. आरसीबीने सात षटकांत दोन गडी बाद ५८ धावा केल्या आहेत.

RCB W vs DC W Live Score : आरसीबीला पहिला धक्का

एलिस कॅप्सीने आरसीबीला पहिला धक्का दिला. तिने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर सोफी डिव्हाईनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डेव्हाईनने ११ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १४ धावा केल्या. तिने स्मृती मानधनासोबत पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. आरसीबीने ५ षटकांत एक गडी बाद ४७ धावा केल्या आहेत.

RCB W vs DC W Live Score : आरसीबीची वेगवान सुरूवात

आरसीबीच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चांगली सुरुवात केली आहे. दोघींनी संघाची धावसंख्या तीन षटकांत ३१ धावांपर्यंत नेली. स्मृती ९ चेंडूत नाबाद १७ धावा आणि डेव्हाईन नऊ चेंडूत १४ धावांवर खेळत आहे.

RCB W vs DC W Live Score : दिल्लीच्या २२३ धावा

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला नाही. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत २ बाद २२३ धावा केल्या. त्यांच्यासाठी सलामीवीर शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी शानदार फलंदाजी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ९१ चेंडूत १६२ धावांची भागीदारी केली. शेफाली ४५ चेंडूत ८४ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले. कर्णधार मेग लॅनिंगने ४३ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. तिने १४ चौकार मारले.

१६३ धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव मारिजन कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी सांभाळला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत ६० धावांची नाबाद भागीदारी केली. मारिजन कॅप १७ चेंडूत ३९ आणि जेमिमा रॉड्रिग्जने १५ चेंडूत २२ धावा केल्या. कॅपने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचवेळी जेमिमाने ३ चौकार मारले. आरसीबीकडून हेदर नाइटने दोन्ही विकेट घेतल्या.

RCB W vs DC W Live Score : एकाच षटकात शेफाली-लॅनिंग तंबूत

१५व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आरसीबीला पहिले यश मिळाले. हीदर नाइटने दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगला क्लीन बोल्ड केले. लॅनिंगने ४३ चेंडूत ७२ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत १४ चौकार मारले. यानंतर शेफाली वर्माही पॅव्हेलियनमध्ये परतली. पाचव्या चेंडूवर शेफालीला रिचा घोषने यष्टिचित केले. शेफालीने ४५ चेंडूत ८४ धावा केल्या. तिने १० चौकार आणि ४ षटकार मारले. जेमिमा रॉड्रिग्ज आणि मारिजेन कॅप क्रीजवर आहेत. दिल्लीने १५ षटकांत २ बाद १६४ धावा केल्या आहेत.

RCB W vs DC W Live Score : दिल्लीच्या १४ षटकात १५३ धावा

दिल्ली कॅपिटल्सची तुफानी फलंदाजी सुरूच आहे. संघाने १४ षटकात बिनबाद १५३ धावा केल्या आहेत. शेफाली वर्मा ४४ चेंडूत ८४ तर मेग लॅनिंगने ४० चेंडूत ६४ धावांवर खेळत आहेत.

RCB W vs DC W Live Score : मेग लॅनिंगचं अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने ११व्या षटकात हेदर नाइटच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. दिल्ली कॅपिटल्सने ११ षटकांत बिनबाद ११९ धावा केल्या आहेत. शेफाली वर्मा ३५ चेंडूत ६२ आणि कर्णधार मेग लॅनिंगने ३१ चेंडूत ५२ धावांवर खेळत आहे.

RCB W vs DC W Live Score : दिल्लीच्या १० षटकात १०० धावा

दिल्ली कॅपिटल्सच्या १०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर १०० धावा पूर्ण झाल्या. मेगन शुटच्या चेंडूवर शेफाली वर्माने संघाची धावसंख्या १०० धावांपर्यंत पोहोचवली. यासोबतच तिने आपले अर्धशतकही पूर्ण केले. दिल्लीने १० षटकांत बिनबाद १०५ धावा केल्या आहेत. शेफाली वर्मा ३२ चेंडूत ५४ तर कर्णधार मेग लॅनिंगने २८ चेंडूत ४७ धावांवर खेळत आहेत.

RCB W vs DC W Live Score : पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या ५७ धावा 

पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने ५७ धावा केल्या आहेत. कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली आहे. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. शेफाली वर्मा २० चेंडूत २९ आणि मेग लॅनिंग १६ चेंडूत २४ धावांवर खेळत आहेत.

RCB W vs DC W Live Score : दिल्लीच्या फलंदाजीला सुरुवात 

दिल्ली कॅपिटल्सचा डाव सुरू झाला आहे. स्फोटक फलंदाज शेफाली वर्मा कर्णधार मेग लॅनिंगसह क्रीजवर उतरली आहे. बंगळुरूसाठी रेणुका ठाकूरने गोलंदाजीची सुरुवात केली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघ

तान्या भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मेग लॅनिंग (कर्णधार), एलिस कॅप्सी, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, शिखा पांडे, मारिझान कॅप, स्नेहा दीप्ती, राधा यादव, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, जेस जोनासेन, तिता साधू , अपर्णा मंडल, मिन्नू मणी, तारा नॉरिस

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ

स्मृती मानधना (कर्णधार), डेन व्हॅन निकर्क, एलिस पेरी, हेदर नाइट, सोफी डिव्हाईन, एरिन बर्न्स, रिचा घोष (विकेटकीपर), मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, दिशा कासट, कोमल झांझाड, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, प्रीती बोस, सहाना पवार, पूनम खेमनार, आशा शोभना, इंद्राणी रॉय

RCB W vs DC W Live Score : आरसीबीने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने एलिस पेरी, मेगन शुट, सोफी डिव्हाईन आणि हीदर नाइट या चार परदेशी खेळाडूंना संघात ठेवले आहे.

RCB W vs DC W Live Score: थोड्याच वेळात नाणेफेक

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील नाणेफेक थोड्याच वेळात होईल. स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष लागले आहे. आता पहिला विजय कोणाला मिळतो ते पाहणे रंजक ठरणार आहे.

आरसीबीकडे पेरी, हीदर नाइट आणि सोफी डिव्हाईन सारखे खेळाडू

आरसीबीने त्यांच्या संघात दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश केला आहे. यात एलिस पेरी, हीदर नाइट आणि सोफी डिव्हाईन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. सोबतच संघात ऋचा घोषदेखील आहे. यामुळे संघ मजबूत दिसत आहे.

दिल्लीकडे मॅग लॅनिंगसारखी कर्णधार 

तर दिल्ली कॅपिटल्सकडे कर्णधार मेग लॅनिंगसह जेस जोनासेन, मारिजाने कॅप आणि एलिस कॅप्स हे ४ परदेशी तगडे खेळाडू आहेत. सोबतच दिल्लीकडे शेफाली, जेमिमा रॉड्रिग्स, शिखा पांडे, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया, राधा यादव या भारताच्या अनुभवी खेळाडू आहेत. यामुळे सामना चांगलाच चुरशीचा होणार आहे.

दोन्ही संघ

दिल कॅपिटल (DC) : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, एलिस कॅप्स, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, मारिजाने कॅप, पूनम यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया (विकेटकीपर), अपर्णा मंडल (विकेटकीपर), तितास साधू, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मीनू मणी, जसिया अख्तर.

आरसीबी (RCB): स्मृती मानधना (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), डेन व्हॅन निकेर्क, हेदर नाइट, एलिस पेरी, मेगन शुट, सोफी डिव्हाईन, एरिन बर्न्स, दिशा कासट, सहाना पवार, रेणुका ठाकूर, कोमल जंजाड, पूनम खेमनार, कनिका आहुजा , प्रीती बोस, शोभना आशा, श्रेयंका पाटील आणि इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक).

WhatsApp channel