मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs GUJ Highlights : आरसीबीचा सलग दुसरा विजय, सोफी डिव्हाईनच्या ३६ चेंडूत ९९ धावा

RCB vs GUJ Highlights : आरसीबीचा सलग दुसरा विजय, सोफी डिव्हाईनच्या ३६ चेंडूत ९९ धावा

Mar 18, 2023 07:27 PM IST

RCB vs GUJ W Live Score : महिला प्रीमियर लीग (WPL) चा १६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात (GG VS RCB) खेळला गेला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर गुजरातने २० षटकात १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने अवघ्या १५.३ षटकात लक्ष्य गाठले.

RCB vs GUJ W Live Score
RCB vs GUJ W Live Score

RCB vs GG WPL Cricket Score, Gujarat vs Bangalore WPL Match 16 Updates : मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सोफी डिव्हाईनच्या धडाकेबाज खेळीमुळे आरसीबीने सलग दुसरा सामना जिंकला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत चार बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५.३ षटकांत २ बाद १८९ धावा करून सामना जिंकला. त्यांच्यासाठी सोफी डिव्हाईनने ३६ चेंडूत ९९ धावांची स्फोटक खेळी खेळली.

ट्रेंडिंग न्यूज

RCB vs GUJ wpl  Score updates

आरसीबीचा मोठा विजय

आरसीबीने गुजरात जायंट्सविरुद्ध मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी २७ चेंडू बाकी असताना आणि ८ विकेट्स राखून सामना जिंकला. सोफी डिव्हाईनच्या झंझावाती खेळीमुळे आरसीबीने सलग दुसरा सामना जिंकला. या विजयासह त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे.

आरसीबीचे आता ७ सामन्यांतून २ विजयांसह ४ गुण झाले आहेत. त्याचबरोबर गुजरात जायंट्सचेही सात सामन्यांतून दोन विजयांसह चार गुण आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे आरसीबी चौथ्या स्थानावर आहे. तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे.

आरसीबीला त्यांचा शेवटचा साखळी सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. तर गुजरात जायंट्सला त्यांचा शेवटचा सामना विरुद्ध यूपी वॉरियर्स विरुद्ध खेळायचा आहे.

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत चार बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५.३ षटकांत २ बाद १८९ धावा करून सामना जिंकला. त्यांच्यासाठी सोफी डिव्हाईनने ३६ चेंडूत ९९ धावांची स्फोटक खेळी खेळली. डिव्हाईनने नऊ चौकार आणि आठ षटकार मारले. तिचा स्ट्राइक रेट २७५ होता.

स्मृती मानधनाने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. हीदर नाइटने १५ चेंडूत २२ आणि एलिस पेरीने १२ चेंडूत १९ धावा करून सामना संपवला. दोन्ही फलंदाज नाबाद राहिले.

RCB vs GG Live Score : डिव्हाईनचे शतक हुकले

आरसीबीच्या सोफी डिव्हाईनचे शतक हुकले. ती ९९ धावांवर बाद झाली. डेव्हाईनने ३६ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि आठ षटकार ठोकले. तिने २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. किम गर्थच्या गोलंदाजीवर अश्विनी कुमारीने तिचा झेल घेतला.

RCB vs GG Live Score : सोफी डिव्हाईनचं २० चेंडूत अर्धशतक

आरसीबीची अनुभवी फलंदाज सोफी डेव्हाईनने तुफानी फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. डेव्हाईनने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक ठोकले. ती २६ चेंडूत ७८ धावा करून खेळत आहे. आरसीबीच्या ९ षटकात १२५ धावा झाल्या आहेत.

RCB vs GG Live Score : आरसीबीचा स्कोअर ७ षटकात ९०/०

आरसीबीने झंझावाती फलंदाजी करताना सात षटकांत ९१ धावा केल्या आहेत. त्यांनी अद्याप एकही विकेट गमावलेली नाही. सोफी डेव्हाईन १८ चेंडूत ४७ आणि स्मृती मानधना २५ चेंडूत ३४ धावा करून खेळत आहे. 

RCB vs GG Live Score : आरसीबीची धमाकेदार सुरुवात

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी तीन षटकांत बिनबाद ३९ धावा केल्या आहेत. सोफी डिव्हाईन नऊ चेंडूत २५ आणि स्मृती मानधना नऊ चेंडूत सात धावा करून खेळत आहे.

RCB vs GG Live Score : गुजरातच्या १८८ धावा

गुजरात जायंट्सने २० षटकात ४ बाद १८८ धावा केल्या. आरसीबीला विजयासाठी १८९ धावा कराव्या लागतील. जर त्यांचा संघ लक्ष्य गाठू शकला नाही तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील. अशा स्थितीत स्मृती मानधनाच्या संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे.

गुजरातकडून लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक ६८ धावा केल्या. तिने ४२ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. ऍशले गार्डनरने २६ चेंडूत ४१ आणि सबिनेनी मेघनाने ३२ चेंडूत ३१ धावा केल्या. सोफिया डंकले १० चेंडूत १६ धावा करून बाद झाली. शेवटच्या षटकात हरलीन देओल आणि दयालन हेमलता यांनी तुफानी फलंदाजी केली.

दोघींनी मिळून ९ चेंडूत २७ धावांची भागीदारी केली. हेमलताने सहा चेंडूंत १६ धावा केल्या आणि हरलीन देओलने पाच चेंडूंत १२ धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने दोन बळी घेतले. सोफी डिव्हाईन आणि प्रीती बोस यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

RCB vs GG Live Score : श्रेयांका पाटीलने वॉल्वार्ड-गार्डनरला बाद केले

गुजरात जायंट्सला तिसरा धक्का लॉरा वोल्वार्डच्या रूपाने बसला. ती ४२ चेंडूत ६८ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. श्रेयंका पाटीलने प्रीती बोसच्या हाती वोल्वार्डला झेलबाद केले. 

यानंतर गुजरातला चौथा धक्का अॅशले गार्डनरच्या रूपाने बसला. २६  चेंडूत ४१ धावा करून ती बाद झाली. तिने सहा चौकार मारले. गार्डनरने एक षटकार ठोकला. श्रेयांकने तिला एलबीडब्ल्यू केले.

RCB vs GG Live Score : गुजरातच्या १६ षटकांत १३५/२ धावा

गुजरात जायंट्सने १६ षटकांत २ बाद १३५ धावा केल्या आहेत. लॉरा वोल्वार्ड आणि अॅशले गार्डनर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. वोल्वार्डने ४१ चेंडूत ६८ धावा केल्या. त्याचवेळी गार्डनरने १४ चेंडूत १७ धावा केल्या आहेत.

RCB vs GG Live Score : गुजरातला दुसरा धक्का

प्रीती बोसने गुजरातला दुसरा धक्का दिला. तिने सबिनेनी मेघनाला यष्टिचित बाद केले. मेघनाने ३२ चेंडूत ३१ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत ४ चौकार मारले. गुजरातने १३ षटकांत २ बाद ९८ धावा केल्या आहेत. लॉरा वोल्वार्ड आणि ऍशले गार्डनर क्रीजवर आहेत. 

RCB vs GG Live Score : पॉवरप्लेमध्ये ४५ धावा

गुजरातच्या डावाचा पॉवरप्ले संपला आहे. त्यांनी सहा षटकात एक बाद ४५ धावा केल्या आहेत. सोफिया डंकलेला बाद केल्यानंतर लॉरा वोल्वार्ड आणि सबिनेनी मेघना यांनी डाव सावरला आहे. वोल्वार्ड १२ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर मेघनाने १४ चेंडूत ६ धावा केल्या आहेत.

RCB vs GG Live Score : पहिला धक्का गुजरातला 

सोफी डिव्हाईनने गुजरात जायंट्सला पहिला धक्का दिला आहे. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिने सोफिया डंकलीला क्लीन बोल्ड केले. डंकलेने १० चेंडूत १६ धावा केल्या. यादरम्यान तिने तीन चौकार मारले. गुजरातने तीन षटकांत एका विकेटवर २८ धावा केल्या आहेत. लॉरा वोल्वार्ड १० आणि सबिनेनी मेघना एका धावेवर खेळत आहेत.

RCB vs GG Live Score : गुजरातचा डाव सुरू 

आरसीबीविरुद्ध गुजरात जायंट्सचा डाव सुरू झाला आहे. लॉरा वोल्वार्ड आणि सोफिया डंकले क्रीजवर आहेत. सोफी डिव्हाईनने आरसीबीसाठी गोलंदाजीची सुरुवात केली आहे.

RCB vs GG Live Score  : दोन्ही संघ 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: सोफी डेव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कसाट, मेगन शुट, आशा शोभना, प्रीती बोस.

गुजरात जायंट्स: सोफिया डंकले, लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, ऍशले गार्डनर, दयालन हेमलता, सबिनेनी मेघना, सुषमा वर्मा (विकेटकीपर), किम गर्थ, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कंवर, अश्विनी कुमारी.

RCB vs GG WPL Live Score - गुजरातची प्रथम फलंदाजी

गुजरात जायंट्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातची कर्णधार स्नेह राणाने संघात एक बदल केला. मानसी जोशीला संघातून वगळण्यात आले आहे. तिच्या जागी सबीनेनी मेघना परतली आहे. आरसीबीबद्दल बोलायचे झाले तर स्टार गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरला या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. तिच्या जागी प्रीती बोसला संघात घेण्यात आले आहे.

WhatsApp channel