मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs DC WPL Highlights : आरसीबीचा पुन्हा पराभव, दिल्लीनं शेवटच्या षटकात सामना जिंकला

RCB vs DC WPL Highlights : आरसीबीचा पुन्हा पराभव, दिल्लीनं शेवटच्या षटकात सामना जिंकला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 13, 2023 07:28 PM IST

RCB Vs DEL WPL Score : महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात आज (१३ मार्च) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी RCB) झाला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्लीने शेवटच्या षटकात विजय मिळवला.

RCB vs DC WPL Live Score
RCB vs DC WPL Live Score

WPL Cricket Score, DEL vs RCB Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात आज (१३ मार्च) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी RCB) झाला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्लीने शेवटच्या षटकात विजय मिळवला.

RCB Vs DC WPL Score UPDATES 

दिल्लीचा शानदार विजय

महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ४ बाद १५० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १९.४ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

बंगळुरू संघाचा हा सलग पाचवा पराभव आहे. या लीगमध्ये संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही आणि गुणतालिकेत ते तळाच्या पाचव्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर दिल्ली संघाचा पाच सामन्यांतील हा चौथा विजय ठरला. मुंबईविरुद्धचा एकमेव सामना संघाने हरला आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला आठ अंक आहेत.

दरम्यान, १५१ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात वाईट झाली. शेफाली वर्मा दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाली. तिला मेग शूटने तंबूत पाठवले. त्यानंतर आलेल्या एलीस कॅप्सीने वेगाने धावा केल्या. तिने २४ चेंडूत ३८ धावांची दमदार खेळी केली. कॅप्सीने आपल्या खेळीत ८ चौकार मारले. त्यानंतर जेमिमाहने कर्णधार मेग लॅनिंगसोबत काही काळ डाव सावरला. मात्र लॅनिंग या सामन्यात विशेष काही करू शकली नाही. तिने १८ चेंडूत १५ धावा केल्या. त्यानंतर मारिजेन कॅप आणि जेस जोनासन यांनी संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूवर दोन सिंगल आल्यानंतर जेस जोनासनने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला आणि विजय निश्चित केला. त्यानंतर जेसने पुढच्या म्हणजेच चौथ्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. शेवटचे षटक रेणुका सिंगे टाकले. जेस जोनासेनने ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५ चेंडूत २९ धावा केल्या. तर मारिजेन कॅपने नाबाद ३२ चेंडूत ३२ धावा केल्या.

RCB Vs DC WPL Live Score : दिल्लीला चौथा  धक्का 

दिल्लीला १५व्या षटकात चौथा धक्का बसला. आशा शोभनाने जेमिमा रॉड्रिग्जला यष्टिरक्षक रिचा घोषकरवी झेलबाद केले. जेमिमाला २८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३२ धावा करता आल्या. दिल्लीची धावसंख्या १५ षटकांत ४ बाद ११४ अशी आहे. आता त्याला ३० चेंडूत ३७ धावांची गरज आहे.

RCB Vs DC WPL Live Score : दिल्लीला दुसरा धक्का 

दिल्लीला पाचव्या षटकात ४५ धावांवर दुसरा धक्का बसला. २४ चेंडूत ३८ धावांची दमदार खेळी करून एलिस कॅप्सी बाद झाली. तिने आपल्या खेळीत ८ चौकार मारले. सध्या कर्णधार मेग लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्ज क्रीजवर आहेत. दिल्लीला आता ८४ चेंडूत १०६ धावांची गरज आहे.

RCB Vs DC WPL Live Score : पहिला धक्का दिल्लीला

डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. मेगन शुटने शेफाली वर्माला क्लीन बोल्ड केले. शेफालीला खातेही उघडता आले नाही. सध्या कर्णधार मेग लॅनिंग आणि अॅलिस कॅप्सी क्रीजवर आहेत.

RCB Vs DC WPL Live Score : आरसीबीच्या १५० धावा

आरसीबी निर्धारित २० षटकात १५० धावा केल्या आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ४ बाद १५० धावा केल्या. बेंगळुरूकडून एलिस पेरीने ५२ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय रिचा घोषने १६ चेंडूत ३७ धावा केल्या. या दोघींशिवाय एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.

बंगळुरूची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्मृती मानधना पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि १५ चेंडूत ८ धावा करून बाद झाली. यानंतर सोफी डिव्हाईनही १९ चेंडूत २१ धावा करून बाद झाली. शिखा पांडेने दोघींना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर १२ चेंडूत ११ धावा करून हीदर नाइटही तारा नॉरिसची शिकार झाली.

६३ धावांत तीन विकेट पडल्यानंतर पेरी आणि रिचा यांनी कमान सांभाळली. दोघींनी चौथ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, १९व्या षटकात शिखा पांडेने रिचा घोषला यष्टिरक्षक तानिया भाटियाकरवी झेलबाद केले.

रिचाने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. पेरीने ६७ धावांच्या नाबाद खेळीत ४ चौकार आणि ५  षटकार मारले. शेवटच्या ५ षटकात पेरीच्या बळावर आरसीबीने ७० धावा केल्या आणि एक विकेट गमावली. दिल्लीकडून शिखाने ३ आणि नॉरिसने १ विकेट घेतली.

RCB Vs DC WPL Live Score : रिचा घोष बाद

१९व्या षटकात शिखा पांडेने रिचा घोषला यष्टिरक्षक तानिया भाटियाकरवी झेलबाद केले. रिचा १६ चेंडूत ३७ धावा करून बाद झाली. या खेळीत तिने तीन चौकार आणि तीन षटकार मारले. एलिस पेरीसोबत तिने चौथ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. सध्या श्रेयंका पाटील आणि एलिस पेरी क्रीजवर आहेत.

RCB Vs DC WPL Live Score : रिचा-पेरीने षटकारांचा पाडला पाऊस 

१८ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तीन बाद १३५ धावा केल्या आहेत. सध्या रिचा घोष १५ चेंडूत ३७ धावांवर तर एलिस पेरी ४७ चेंडूत ५७ धावांवर खेळत आहे. पेरीने षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले.

RCB Vs DC WPL Live Score : आरसीबीला तिसरा धक्का

आरसीबीला १३व्या षटकात तिसरा धक्का बसला. तारा नॉरिसने हिदर नाइटला शिखा पांडेकरवी झेलबाद केले. शिखाने शॉर्ट फाइन लेगवर शानदार झेल घेतला. हीदरला १२ चेंडूत ११ धावा करता आल्या. एलिस पेरी आणि रिचा घोष सध्या क्रीजवर आहेत. १४ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या तीन बाद ६८ धावा आहे.

RCB Vs DC WPL Live Score : सोफी डिव्हाईनही आऊट

१० षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २ बाद ५० धावा केल्या आहेत. सध्या अॅलिस पेरी २४ चेंडूत १९ धावा आणि हीदर नाईट २ धावा करून क्रीजवर आहे. स्मृती मानधना (८) पाठोपाठ शिखा पांडेने सोफी डिव्हाईनलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डिव्हाईनला १९ चेंडूंत ३चौकारांच्या मदतीने २१ धावा करता आल्या.

RCB Vs DC WPL Live Score : RCB ला पहिला धक्का

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिला धक्का २४ धावांवर बसला. कर्णधार स्मृती मानधना १५ चेंडूत ८ धावा करून बाद झाली. तिने आपल्या डावात एक चौकार लगावला. एलिस पेरी आणि सोफी डिव्हाईन सध्या क्रीजवर आहेत. पाच षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या एका विकेटवर २८ आहे.

RCB Vs DC WPL Live Score : आरसीबीची चांगली सुरुवात

आरसीबीने चांगली सुरुवात केली आहे. तीन षटकांनंतर आरसीबीचा स्कोअर १७/० आहे. मानधना-डेव्हाईन क्रीजवर आहेत.

RCB Vs DC WPL Live Score : दोन्ही संघ

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिजाने कॅप, तान्या भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, शिखा पांडे, तारा नॉरिस.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस.

RCB Vs DEL WPL Live Score: दिल्लीची प्रथम गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॅनिंगने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. एलिस कॅप्सी आणि अरुंधती रेड्डी यांना संघात स्थान देण्यात आले आहे. एल हॅरिस आणि मिन्नू मणी यांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधना हिनेही काही बदल केले आहेत.

WhatsApp channel