SRH vs RCB : हैदराबादला चिरडत आरसीबी टॉप ४ मध्ये, कोहलीचं ४ वर्षांनंतर IPL शतक
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  SRH vs RCB : हैदराबादला चिरडत आरसीबी टॉप ४ मध्ये, कोहलीचं ४ वर्षांनंतर IPL शतक

SRH vs RCB : हैदराबादला चिरडत आरसीबी टॉप ४ मध्ये, कोहलीचं ४ वर्षांनंतर IPL शतक

May 18, 2023 11:13 PM IST

SRH vs RCB ipl 2023 highlights : आयपीएल 2023 च्या ६५व्या सामन्यात बंगळुरूने हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. १८ मे (गुरुवार) रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात पूर्ण केले.

SRH vs RCB ipl 2023 highlights
SRH vs RCB ipl 2023 highlights

SRH vs RCB ipl 2023 highlights : आयपीएल 2023 च्या ६५व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. १८ मे (गुरुवार) रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात पूर्ण केले. आरसीबीच्या विजयाचे हिरो विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस ठरले.

विराट कोहलीने ६३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. 

डु प्लेसिसबद्दल बोलायचे झाले तर त्याने ४७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. डु प्लेसिसने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. डू प्लेसिस आणि कोहली यांनी मिळून १७.५ षटकांत १७२ धावांची तुफानी भागीदारी केली.

हैदराबादचा डाव

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यांनी आपॉवरप्लेमध्येच सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. ५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्मा (११) मायकल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर महिपाल लोमररकरवी झेलबाद झाला. त्यानंतर एका चेंडूनंतर ब्रेसवेलने राहुल त्रिपाठीलाही आपला बळी बनवले. येथून एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन यांनी ७६ धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. शाहबाज अहमदने मार्करामला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मार्करामने २० चेंडूत १८ धावा केल्या.

मार्कराम बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूक आणि क्लासेन यांच्यात ७४ धावांची भागीदारी झाली. मार्करामने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना १०४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यादरम्यान क्लासेनने ५१ चेंडूंचा सामना केला आणि आठ चौकारांशिवाय सहा षटकार ठोकले. हॅरी ब्रूक २७ धावा करून नाबाद राहिला.

Whats_app_banner