Dhoni Jadeja Fight : धोनी-जडेजाचं भांडण, जड्डूच्या नव्या ट्विटचा अर्थ काय? जाणून घ्या
dhoni Jadeja Fight : आयपीएल सामन्यांपेक्षा एका वेगळ्याच विषयाची चर्चा अधिक रंगली आहे. हा विषय आहे, धोनी आणि जडेजा यांच्यातील वादाचा. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Jadeja Viral Tweet) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
MS dhoni Ravindra Jadeja Fight : चेन्नई सुपर किंग्जने IPL 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा १४ धावांनी पराभव केला. चेन्नईच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करताना २ बळी घेतले. त्याने ४ षटकात १८ धावा दिल्या. जडेजाच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला 'मोस्ट व्हॅल्युएबल अॅसेट ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला.
ट्रेंडिंग न्यूज
या पुरस्कारानंतर जडेजाने एक ट्विट केले आहे, या ट्विटनंतर चांगलाच गदारोळ सुरू झाला आहे. सोशल मीडियावर चाहते याबाबत विविध प्रतिक्रिया देत आहेत.
सीएसकेच्या विजयानंतर जडेजाने पुरस्कारासोबतचा एक फोटो शेअर केला. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने चाहत्यांसाठी एक गोष्ट लिहिली आहे.
जडेजाने लिहिले की, “अपस्टॉक्सला समजते, परंतु काही चाहत्यांना समजत नाही”.
जडेजाच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही चाहते जडेजाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत आहेत. जडेजाच्या या ट्विटनंतर ट्विटरवर 'कम टू आरसीबी' हा हॅशटॅग काही काळ ट्रेंड करू लागला.
रवींद्र जडेजासंदर्भात कम टू आरसीबी हा हॅशटॅग २४ मे रोजी ट्विटरवर बराच काळ ट्रेंड करत होता. रवींद्र जडेजाबाबत एका यूजरने लिहिले - त्याला चेन्नईच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळत नाहीये. त्याचवेळी एका ट्विटर युजरने तर RCB मध्ये ये, देवासारखी तुझी पूजा करेन, असेही लिहिले.
नेमका वाद काय?
खरे तर काही दिवसांपासून चेन्नईचे चाहते रवींद्र जडेजाला सपोर्ट करत नसल्याच्या बातम्या येत आहेत. अशातच जडेजा आणि धोनीच्या भांडणाच्या बातम्याही समोर आल्या आहेत. दिल्ली-चेन्नई सामन्यानंतर महेंद्रसिंग आणि रवींद्र जडेजा यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये दोघांमध्ये कशावरून तरी वादावादी झाल्याचे दिसते. ही घटना २० मे रोजी दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतरची आहे. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू डगआऊटच्या दिशेने परतत असताना हा प्रसंग घडला.
दिल्ली-चेन्नई सामन्यानंतर जडेजाचं ट्विट
या वादाच्या एका दिवसानंतर जडेजाने एक ट्विट केले होते. त्यामुळे आता हा वाद वाढत चालल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या ट्विटवर जडेजाची पत्नी रिवाबानेही प्रतिक्रिया दिली आहे. रिवाबाच्या या प्रतिक्रियेनंतर धोनी आणि जडेजा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जडेजाचे ट्विट काय होते?
जडेजाने एक फोटो शेअर केला होता, या फोटोत लिहिले होते की "तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ मिळेल, लवकरच किंवा काही वेळानंतर… ते तुम्हाला नक्कीच मिळेल." सोबतच जडेजाने या फोटोला डेफिनेटली असे कॅप्शन दिले".
जडेजाच्या या ट्विटनंतर त्याच्या पत्नीने त्याला पाठिंबा दिला. जडेजाच्या ट्विटला रिट्विट करत रिवाबाने लिहिले की, ‘तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा.’
दरम्यान, आता पहिल्या क्वालिफायरनंतरही जडेजाने ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.