मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravindra Jadeja: टीम इंडियासाठी गुड न्यूज! जडेजाची शस्त्रक्रिया यशस्वी; वर्ल्डकप खेळणार? जाणून घ्या

Ravindra Jadeja: टीम इंडियासाठी गुड न्यूज! जडेजाची शस्त्रक्रिया यशस्वी; वर्ल्डकप खेळणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 06, 2022 09:54 PM IST

Ravindra Jadeja Surgery: भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जडेजाने गुडघ्याच्या दुखापतीबाबत सोशल मीडियावर एक नवीन अपडेट दिली आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे चालू आशिया चषक स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागली. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, आता त्याचे यशस्वी ऑपरेशन झाले आहे. जडेजाने त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. लवकरात लवकर मैदानात परतण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही जडेजाने पोस्टमध्ये सांगितले आहे.

रवींद्र जडेजाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अनेकांनी पाठिंबा दिला, यासाठी मी तुमचा आभारी आहे. यामध्ये बीसीसीआय, माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, डॉक्टर आणि चाहते यांचा समावेश आहे. मी लवकरच माझे रिहॅब सुरू करेन आणि लवकरात लवकर क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.'

जडेजा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर होणार का?

शस्त्रक्रियेनंतर रवींद्र जडेजाचे २०२२ च्या टी-20 विश्वचषकात खेळणे कठीण मानले जात आहे. शस्त्रक्रिया तर यशस्वी झालाी आहे. मात्र, जडेजाला मैदानात परतायला किती किती काळ लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रवींद्र जडेजाला तंदुरुस्त होण्यासाठी किमान सहा महिने लागू शकतात.

राहुल द्रविड काय म्हणाला-

मात्र, सध्या जडेजाला टी-२० विश्वचषकातून बाहेर समजणे योग्य होणार नाही, असे प्रशिक्षक राहुल द्रविडचे मत आहे. राहुल द्रविड म्हणाला होता की, 'रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो आशिया कपमधून बाहेर आहे. विश्वचषकाला अजून वेळ आहे. त्यामुळे त्याला वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याचे समजता येणार नाही. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. जोपर्यंत आमच्याकडे याबद्दल स्पष्ट माहिती येत नाही तोपर्यंत यावर जास्त भाष्य करणे योग्य होणार नाही.'

WhatsApp channel

संबंधित बातम्या