मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rashid Khan: ऐकत नाही भाऊ! राशीदच्या टी-२० क्रिकेटमधील ५०० विकेट्स पूर्ण, जगातील दुसरा गोलंदाज ठरला
Rashid Khan
Rashid Khan

Rashid Khan: ऐकत नाही भाऊ! राशीदच्या टी-२० क्रिकेटमधील ५०० विकेट्स पूर्ण, जगातील दुसरा गोलंदाज ठरला

25 January 2023, 11:09 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Rashid Khan Pick 500 Wickets in T20s: अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर राशीद खानने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील ५०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे.

Rashid Khan Records: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर राशीद खानने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. या लीगमध्ये एमआय केपटाऊनकडून खेळताना राशीद खान प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील ५०० वी विकेट्स घेतली. टी-२० क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा गाठणारा राशीद खान दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी वेस्ट इंडीजचा स्टार ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होने हा पराक्रम केला होता. ब्राव्होच्या नावावर ६१४ विकेट्सची नोंद आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत ड्वेन ब्राव्हो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ५५६ सामन्यात ६१४ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर राशीद खान ५०० विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अवघ्या ३७१ सामन्यात अशी कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचा सुनील नारायण आहे. त्याच्या नावावर ४७४ विकेट्सची नोंद आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर इम्रान ताहीर तर, पाचव्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकीब अल हसन आहे. त्या दोघांनी अनुक्रमे ४६६ व ४३६ विकेट्स घेतल्या आहेत.

रशीद खानने कॅपिटल्सविरुद्ध जबदस्त गोलंदाजी करत चार षटकांत १६ धावा देऊन तीन विकेट्स घेतले. 24 वर्षीय फिरकीपटूने 14व्या षटकातील पहिल्या चेंडूत क्लाईड फॉर्च्युइनची विकेट मिळवून 500 टी-२० क्रिकेटमधील ५०० विकेट्सचा टप्पा गाठला.

विभाग