Tennis Star Rafael Nadal Retirement : टेनिस जगताचा सुपरस्टार राफेल नदाल याने टेनिसला अलविदा केला आहे. स्पॅनिश टेनिस स्टारने डेव्हिड कपमध्ये कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या टेनिस दिग्गजाने गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्येच आपली निवृत्ती जाहीर केली होती.
नदालने डेव्हिस चषकातील शेवटचा सामना मंगळवारी (१९ नोव्हेंबर) नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डी झिडशल्प याच्याविरुद्ध खेळला. या सामन्यात नदालला बोटिक व्हॅन डीने ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये नदालने दमदार पुनरागमन केले, पण अखेर त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
३८ वर्षीय नदालने २२ ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदांसह निवृत्ती घेतली. याशिवाय त्याने टेनिसमध्येही अनेक कामगिरी केली. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी, नदालने आपल्याला आपल्या ऍथलेटिक आणि वैयक्तिक गुणांसाठी लक्षात ठेवण्याची विनंती केली.
नदाल म्हणाला, "मी मनःशांती घेऊन जात आहे की मी एक वारसा सोडला आहे, जो मला वाटतो की केवळ एक क्रीडा नाही तर वैयक्तिक वारसा आहे." नदाल पुढे म्हणाला, "टालटल्स हे फक्त नंबर आहेत. पण एक चांगला माणूस म्हणून मला अधिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, एक मुलगा ज्याने त्याच्या स्वप्नांचे अनुसरण केले आणि मी जे स्वप्न पाहिले होते त्यापेक्षा जास्त साध्य केले."
आतापर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम सर्बियन खेळाडू नोवाक जोकोविचच्या नावावर आहे. जोकोविचने एकूण २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. त्यानंतर या यादीत दुसरे नाव २२ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालचे आहे. या यादीत पुढे स्विस दिग्गज रॉजर फेडररचे नाव दिसते, ज्याने आपल्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम जिंकले आहेत.
२४ विजेतेपदं - नोव्हाक जोकोविच
२२ विजेतेपदं - राफेल नदाल
२० विजेतेपदं - रॉजर फेडरर
१४ विजेतेपदं- पीट सॅम्प्रस
१२ विजेतेपदं - रॉय इमर्सन.