मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Praggnanandhaa : प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला हरवून रचला इतिहास

Praggnanandhaa : प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला हरवून रचला इतिहास

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 17, 2024 03:27 PM IST

R Praggnanandhaa Defeated Ding Liren : भारताचा युवा बुद्धिबळ सुपरस्टार आर प्रज्ञानंदने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत विद्यमान विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. यासह, तो दिग्गज विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा सर्वोच्च रेटिंग असलेला खेळाडू बनला.

R Praggnanandhaa
R Praggnanandhaa (Sreeram DK)

टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदनने चमकदार कामगिरी केली आणि डिंग लिरेनचा पराभव केला. डिंग लिरेन हा सध्याचा विश्वविजेता आहे. चौथ्या फेरीत त्याला प्रगनानंदने पराभूत केले. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले असून तो नंबर वन भारतीय ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता.

या सामन्यात काळ्या सोंगट्यांसह खेळताना प्रज्ञानंदने ६२ चालींमध्ये विजय मिळवला. क्लासिकल बुद्धिबळ इव्हेंटमध्ये विश्वविजेत्या खेळाडूला पराभूत करणारा प्रज्ञानंदने हा आनंदनंतरचा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला.

या विजयासह प्रग्नानंदने विश्‍वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. प्रज्ञानंद FIDE च्या लाइव्ह रँकिंगमध्ये ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे २७४८.३ गुण आहेत. तर विश्वनाथन आनंद १२ व्या क्रमांकावर आहे. त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. आनंदचे २७४८.० गुण आहेत. या यादीत मॅग्नस कार्लसन अव्वल स्थानावर आहे. फॅबियानो कारुआना दुसऱ्या स्थानावर आहे.

प्रग्नानंद यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०१६ मध्ये तो सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. वयाच्या अवघ्या १० वर्षे १० महिन्यांचा असताना प्रग्नानंदने याने ही कामगिरी केली होती.

२०१७ मध्ये तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर झाला. यानंतर २०१८ मध्येही त्याने असेच यश संपादन केले. प्रग्नानंदने चेन्नईचा येथील आहेत. त्याचा जन्म २००५ मध्ये झाला आहे. त्याचे वडील रमेशबाबू बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

प्रग्नानंदने अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचाही पराभव केला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी जिंकून त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. प्रग्नानंदने उपांत्य फेरीच्या टायब्रेकमध्ये कारुआनाचा पराभव केला होता.

बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय ठरला. याआधी विश्वनाथन आनंदने हा पराक्रम केला होता. पण अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनकडून प्रग्नानंदाचा पराभव झाला.

WhatsApp channel

विभाग