आर अश्विनने २००७ पासून टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन हा टी-२० विश्वचषकात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने १८ सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी १५.२६ आणि इकॉनॉमी रेट ६.०१ आहे.
रवींद्र जडेजा हा T20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. जडेजाने २२ सामन्यात २५.९ च्या गोलंदाजी सरासरी आणि ७.१४ च्या इकॉनॉमी रेटने २१ विकेट घेतल्या आहेत.
या यादीत माजी अष्टपैलू इरफान पठाणचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. इरफानने १५ सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने २०.०६ च्या गोलंदाजी सरासरी आणि ७.४६ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे.
इरफान पठाणसोबत माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगचाही या यादीत समावेश आहे. त्याने १६ विकेट्सही घेतल्या आहेत. हरभजनने त्याच्या कारकिर्दीत १९ टी-20 विश्वचषक सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.२५ च्या गोलंदाजीची सरासरी आणि ६.७८ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे.
माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचाही टॉप-५ गोलंदाजांमध्ये समावेश आहे. नेहराने अवघ्या १० सामन्यात १५ विकेट घेतल्या आहेत. त्याने T20 वर्ल्ड कपमध्ये १७.९३ च्या बॉलिंग सरासरीने आणि ६.८९ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे.