मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA WC: फिफा वर्ल्डकपनंतर ‘या’ ८ स्टेडियमचं काय होणार? कतारनं आधीच लावलंय एक्स्ट्रा दिमाग

FIFA WC: फिफा वर्ल्डकपनंतर ‘या’ ८ स्टेडियमचं काय होणार? कतारनं आधीच लावलंय एक्स्ट्रा दिमाग

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 06, 2022 09:12 PM IST

Qatar Will Make Hotels, Shopping Mall, Schools In Stadiums: कतारमधील ५ फुटबॉल स्टेडियम्सचे शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि शाळांमध्ये रूपांतर केले जाईल. त्याचबरोबर ३ स्टेडियममध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्यात फक्त फुटबॉल खेळाडू सराव आणि सामने खेळतील.

FIFA WC
FIFA WC

फिफा विश्वचषक २०२२ आता एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. सध्या राऊंड ऑफ १६ चा थरार अंतिम टप्प्यात आहे. या फेरीतील विजेते संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरत आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर कतारमधील सर्व ८ स्टेडियमचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण कतारमध्ये फुटबॉल फारसा लोकप्रिय नाही, पण तरी फिफा विश्वचषकासाठी येथे ८ जागतिक दर्जाची स्टेडियम बांधण्यात आली आहेत. फिफा विश्वचषक संपल्यानंतर या सर्व स्टेडियमचा वापर कशासाठी आणि कसा करायचा हे कतारसमोर आव्हान असेल. मात्र, कतारने यावर आधीच उपाय शोधला आहे.

कतारमधील फुटबॉल ५ शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि शाळांमध्ये रूपांतर केले जाईल. त्याचबरोबर ३ स्टेडियममध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्यात फक्त फुटबॉल खेळाडू सराव आणि सामने खेळतील.

सर्व स्टेडियम्सवर १८ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे

कतारमध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी १२ स्टेडियम्सचा प्रस्ताव होता. परंतु नंतर कतारच्या आदेशानुसार फिफाने ८ स्टेडियम्ससाठी सहमती दर्शवली. फिफा विश्वचषक फायनलसाठी ८० हजार प्रेक्षक बसू शकतील अशा स्टेडियमची आवश्यकता होती. याशिवाय उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ६० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले स्टेडियम आवश्यक होते. तर सामान्य सामने आयोजित करण्यासाठी किमान ४० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमची आवश्यकता होती. यातील ७ स्टेडियम नव्याने बांधण्यात आले आहेत. तर खलिफा स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास १८ हजार १२६ कोटी रूपये रुपये खर्च करण्यात आले आहेत.

कतारमधील आठही स्टेडियमचे भविष्यात वेगवेगळे उपयोग होणार आहेत. तीन स्टेडियममध्ये कोणताही बदल होणार नाही. एक स्टेडियम कतार राष्ट्रीय संघासाठी असेल. ज्यामध्ये सर्व खेळाडू सराव करतील. तसेच त्याच स्टेडियमध्ये कतार आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करेल. तर फुटबॉल क्लबसाठी २ स्टेडियम असतील. ज्यामध्ये क्लबचे खेळाडू सराव करतील आणि त्यांचे सामने खेळतील.

कतारमधील ८ स्टेडियमचे काय होणार?

त्याच वेळी, काही स्टेडियममधून एक मजला काढला जाईल. यातून येणारे स्टील आणि जागा गरीब देशांना दान करण्यात येणार आहे. ज्या देशांना स्टेडियम बांधण्याची गरज आहे.

तसेच, फिफा विश्वचषकाच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार, लुसेल स्टेडियममध्ये शाळा, दुकाने, कॅफे, क्रीडा सुविधा आणि दवाखाने असतील.

अल बायत स्टेडियमवर पंचतारांकित हॉटेल, शॉपिंग मॉल आणि स्पोर्ट्स मेडिसिन क्लिनिक उघडले जाईल.

अहमद बिन अली स्टेडियम हे रेनाइस क्लबचे होम ग्राउंड असेल. अल झैनब स्टेडियम हे अल वक्राह संघाचे होम ग्राउंड असेल. तर खलिफा स्टेडियम कतारच्या राष्ट्रीय संघासाठी असणार आहे. या स्टेडियमध्ये २०२६ च्या विश्वचषकासाठीचे पात्रता फेरीचे सामने देखील खेळवले जावू शकतात. २०२४ मध्ये होणाऱ्या आशियाई कपठीही काही स्टेडियमचा वापर केला जाऊ शकतो. कतारला २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाल्यास या स्टेडियमचा ऑलिम्पिकसाठीही वापर केला जाऊ शकतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या