Qatar After FIFA WC: १२ वर्षांपासूनची तयारी, अवघ्या २८ दिवसांत खेळ संपला; कतारमध्ये भयाण शांतता
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Qatar After FIFA WC: १२ वर्षांपासूनची तयारी, अवघ्या २८ दिवसांत खेळ संपला; कतारमध्ये भयाण शांतता

Qatar After FIFA WC: १२ वर्षांपासूनची तयारी, अवघ्या २८ दिवसांत खेळ संपला; कतारमध्ये भयाण शांतता

Published Dec 21, 2022 05:05 PM IST

What Happening in Qatar After FIFA World Cup is Over: फिफा विश्वचषक २०२२ संपल्यानंतर कतार ओसाड झाले आहे. या विश्वचषकासाठी कतारने १२ वर्षांपासून मोठी तयारी केली होती. पण आता स्पर्धा संपल्यानंतर कतारला अवकळा आली आहे. तिथे भयाण शांतता पसरली आहे.

FIFA WC
FIFA WC (Reuters)

Qatar FIFA World Cup 2022: FIFA विश्वचषक २०२२ चा थरार संपला आहे. कतारमध्ये २८ दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ६४ सामने खेळले गेले. अर्जेंटिना या विश्वचषकाचा विजेता ठरला. तर फ्रान्स उपविजेचा. फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणारा कतार हा पहिला अरब देश ठरला आहे. पण २८ दिवसांच्या या भव्य इव्हेंटनंतर कतार आता निर्जन झाला आहे. तिथे भयाण शांतता पसरली आहे. कारण विश्वचषकादरम्यान तयार झालेले उत्साहाचे वातावरण अचानक नाहीसे झाले आहे. सर्व संघ आणि जगभरातील चाहते कतार सोडून निघून गेले आहेत.

कतार १२ वर्षांपासून या विश्वचषकाच्या तयारीत गुंतला होता. फुटबॉलच्या या मेगा इव्हेंटसाठी दोहामध्ये एकूण ७ स्टेडियम बांधण्यात आली होती.

Qatar After FIFA WC
Qatar After FIFA WC (AFP)

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी अनेक विवाद झाले होते. यामध्ये मजुरांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन, दारूविक्री, कपडे घालण्याचे नियम यासह इतर अनेक मुद्द्यांवरून बराच वाद झाला होता. मात्र, विश्वचषक सुरू झाल्यानंतर सर्व वादावर पडदा पडला.

हा विश्वचषक पाहण्यासाठी युरोपमधून जास्त प्रेक्षक आले नाहीत. परंतु अर्जेंटिना आणि मोरोक्कोमधून अपेक्षेपेक्षा जास्त चाहते कतारला पोहोचले. विश्वचषकादरम्यान २० मिलियन पर्यटक कतारमध्ये येतील असा स्पर्धेपूर्वी अंदाज होता. परंतु अधिकृत आकडा ९ लाखांपेक्षाही कमी आहे.

Qatar After FIFA WC
Qatar After FIFA WC (AP)

वर्ल्डकपसाठी बांधलेल्या स्टेडियमचे काय होणार?

काही स्टेडियममधून एक मजला काढला जाईल. यातून येणारे स्टील आणि जागा गरीब देशांना दान करण्यात येणार आहे. ज्या देशांना स्टेडियम बांधण्याची गरज आहे.

विश्वचषक स्पर्धेनंतर कतारमधील सर्व स्टेडियम्सचा विविध कामांसाठी वापर होणार आहे. फिफा वर्ल्डकपच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार, लुसेल स्टेडियममध्ये शाळा, दुकाने, कॅफे, क्रीडा सुविधा आणि दवाखाने उघडले जातील तर अल बायत स्टेडियममध्ये पंचतारांकित हॉटेल, शॉपिंग मॉल आणि स्पोर्ट्स मेडिसिन क्लिनिक सुरू केले जाणार आहे.

अहमद बिन अली स्टेडियम हे रेनाइस क्लबचे होम ग्राउंड असेल. अल झैनब स्टेडियम हे अल वक्राह संघाचे होम ग्राउंड असेल. तर खलिफा स्टेडियम कतारच्या राष्ट्रीय संघासाठी असणार आहे. या स्टेडियमध्ये २०२६ च्या विश्वचषकासाठीचे पात्रता फेरीचे सामने देखील खेळवले जावू शकतात. २०२४ मध्ये होणाऱ्या आशियाई कपठीही काही स्टेडियमचा वापर केला जाऊ शकतो. कतारला २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाल्यास या स्टेडियमचा ऑलिम्पिकसाठीही वापर केला जाऊ शकतो.

जगभरातील चाहत्यांसाठी कतारमध्ये टेंट सिटी बनवण्यात आली होती. याठिकाणी हजारो तंबू लावण्यात आले होते. ज्यात चाहते थांबले होते. आता हे तंबू विश्वचषकानंतर दान केले जाणार आहेत. विश्वचषकासाठी चाहत्यांसाठी तंबू बनवणाऱ्या झाहा हदीद आर्किटेक्ट्स या कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, हे तंबू सीरिया, तुर्की, येमेनमधील निर्वासित आणि विविध गरजू लोकांना दान केले जातील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या