पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची स्टार टेनिसपटू पीव्ही सिंधूने तिच्या दुसऱ्या गट सामन्यात २ सरळ सेटमध्ये विजय मिळवून प्री-क्वार्टर फायनलसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत सिंधूने दोन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली असून, या सामन्यात तिने एकतर्फी विजय मिळवला.
सिंधूने हा सामना ३४ मिनिटांत संपवला. तर लक्ष्य सेननेही पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीच्या गट टप्प्यातील सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा २ सरळ सेटमध्ये पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
पीव्ही सिंधूने या ग्रुप स्टेज मॅचचा पहिला सेट एस्टोनियन खेळाडू क्रिस्टा कुबाविरुद्ध २१-५ अशा फरकाने जिंकला. या सामन्यात पीव्ही सिंधूने दुसरा सेट २१-१० असा जिंकला आणि सलग दोन सेटमध्ये सामना जिंकून प्री-क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले.
याआधी सिंधूने ग्रुप-एममधील पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा पराभव केला होता. सिंधूनेही हा सामना २१-९ आणि २१-११ ने जिंकला.
भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या फेरीत आपल्या गट सामन्यात चमकदार कामगिरी करत इंडोनेशियाचा सर्वोत्तम खेळाडू जोनाथन क्रिस्टीचा सलग २ सेटमध्ये पराभव केला आणि प्री-क्वार्टर फायनलसाठी आपले स्थान निश्चित केले. पहिल्या सेटच्या सुरुवातीला थोडा पिछाडीवर असलेल्या लक्ष्यने नंतर पुनरागमन करत तो २१-१८ असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने जोनाथनला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही आणि तो २१-१२ असा जिंकला आणि प्री-क्वार्टर फायनलसाठी आपले स्थान निश्चित केले.