दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेली पीव्ही सिंधू लवकरच नवीन इनिंग सुरू करणार आहे. पीव्ही सिंधू २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये हैदराबादच्या व्यंकट दत्ता साईसोबत लग्न करणार आहे. पीव्ही सिंधूच्या वडिलांनीच हा खुलासा केला आहे. अलीकडेच लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत पीव्ही सिंधूने विजेतेपद पटकावले होते.
सिंधूने २०१९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकासह एकूण ६ पदके जिंकली. रिओ २०१६ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूला सलग अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळाले.
पीव्ही सिंधूच्या लग्नाशी संबंधित सर्व कार्यक्रम २० डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत, पीव्ही सिंधूच्या लग्नाशी संबंधित बातम्यांदरम्यान, जाणून घेऊया तिची एकूण संपत्ती किती आहे?
पीव्ही सिंधू ही जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, पीव्ही सिंधूची कमाई सुमारे ७.१ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे ६० कोटी रुपये आहे.
पीव्ही सिंधूची कमाई २०१८ मध्ये ८.५ मिलियन डॉलर्स, २०१९ मध्ये ५.५ मिलियन डॉलर्स, २०२१ मध्ये ७.२ मिलियन डॉलर्स आणि २०२२-२०२३ मध्ये ७.१ मिलियन डॉलर्स होती.
बॅडमिंटन व्यतिरिक्त, पीव्ही सिंधूच्या उत्पन्नाचा स्त्रोत ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणूक आहे. २०१९ मध्ये, तिने चीनी क्रीडा वस्तू कंपनी ली निंगसोबत ५० कोटी रुपयांचा चार वर्षांचा करार केला होता.
सिंधूने मेबेलाइन, बँक ऑफ बडोदा, यांसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँडसोबत काम केले आहे. ती एशियन पेंट्स आणि इतर ब्रँड्सची ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. पी.व्ही. सिंधूचे एंडोर्समेंट डील तिच्या कमाईत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पीव्ही सिंधूला एक प्रभावी रिअल इस्टेट पोर्टफोलिओ आहे. हैदराबादमध्ये तिचे एक आलिशान घर आहे.
पीव्ही सिंधूकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तिच्याकडे BMW X5 कार आणि BMW 320D देखील आहे, जी त्याला महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरने भेट दिली होती. पीव्ही सिंधूकडे एक महिंद्रा थार आहे जी तिला आनंद महिंद्राने भेट दिली होती.
पीव्ही सिंधूने आतापर्यंत दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य पदक जिंकले आणि २०१९ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे, सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती एकमेव खेळाडू आहे.
पीव्ही सिंधू २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये व्यंकट दत्ता साईसोबत सात फेरे घेणार आहे. वेंकट दत्ता साई हे पॉसाइडेक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक आहेत.