Punjab Kings IPL 2023 : आयपीएलच्या या मोसमात (IPL 2023) पंजाब किंग्जचा संघ खूप मजबूत दिसत आहे. अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे या संघाला यावेळी IPL चॅम्पियन बनवू शकतात.
(1 / 7)
आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्जला त्यांच्या संघाकडून मोठ्या अपेक्षा असतील. दरवर्षीप्रमाणे याही आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने बरेच बदल केले आहेत.
(2 / 7)
शिखर धवन- Shikhar Dhawan - यंदा शिखर धवनला कर्णधारपदाची धुरा सोपण्यात आली आहे. तो त्याच्या अनुभवाच्या जोरावर संघाला चॅम्पियन बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
(3 / 7)
अर्शदीप सिंग Arshdeep Singh -अर्शदीपने गेल्या काही वर्षांत पंजाब किंग्जसाठी चांगली कामगिरी केली आहे. या जोरावरच त्याने टीम इंडियात स्थान मिळवले आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्जला त्याच्याकडून यंदा पूर्वीपेक्षा जास्त अपेक्षा असतील.
(4 / 7)
लियाम लिव्हिंगस्टन - Liam Livingstone - इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूला पंजाबने संघात कायम ठेवले आहे. या खेळाडूने गेल्या काही हंगामात पंजाबसाठी चांगली कामगिरी केली आहे. लांब षटकार मारण्यासोबतच तो फिरकी गोलंदाजी करू शकतो.
(5 / 7)
सॅम करन sam curran- पंजाब किंग्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली १८.५० कोटी रुपये देऊन सॅम करनला संघात घेतले आहे. लेफ्ट आर्म स्विंग गोलंदाजीसोबतच तो डाव्या हाताने फलंदाजीही करू शकतो.
(6 / 7)
कागिसो रबाडा Kagiso Rabada - दक्षिण आफ्रिकेचा मुख्य वेगवान गोलंदाजाला पंजाब किंग्जने ९.२५ कोटी रुपयांना रिटेन केले आहे. या गोलंदाजाला कधीही खेळापासून दूर ठेवता येणार नाही. रबाडाच्या अनुभवातून पंजाबला बरीच मदत मिळू शकते.