Ihsanullah PSL 2023 : वय अवघं २० वर्षे… पण शोएबचा विक्रम मोडण्याची क्षमता, इहसानुल्लाह आहे तरी कोण?
who is Ihsanullah PSL 2023 : पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज इहसानुल्लाह सध्या PSL 2023 मध्ये ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करत आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
pakistan fast bowler ihsanullah : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (१५ फेब्रुवारी) क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि मुलतान सुलतान्स यांच्यात सामना झाला. त्या सामन्यात मुल्तानचा वेगवान गोलंदाज इहसानुल्लाहने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने अवघ्या १२ धावांत ५ बळी घेतले. या मोसमातील त्याचा हा दुसराच सामना होता. याआधी त्याने लाहोर कलंदर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २ बळी घेतले होते.
ट्रेंडिंग न्यूज
तर १७ फेब्रुवारीला मुलतान सुलतानचा सामना पेशावर जाल्मीशी झाला. या सामन्यातही इहसानुल्लाहने पुन्हा चमकदार कामगिरी केली. म्हणजेच आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या कर्णधाराच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. सध्या पीएसएलमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीची प्रचंड चर्चा आहे.
क्रिकेटर बनण्यासाठी अनेक अडचणींचा सामना केला
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, २० वर्षीय इहसानुल्लाला क्रिकेटर बनण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचा जन्म पाकिस्तानच्या उत्तरेकडील स्वात खोऱ्यातील अरकोट गावात झाला. २०२२ मध्ये पाकिस्तानात आलेल्या भीषण पुरात त्याचे घर वाहून गेले होते. या पुरामुळे पाकिस्तानात लाखो लोक बाधित झाले आहेत. इहसानुल्लाचाही यात समावेश आहे.
अशी मिळाली संधी
इहसानुल्लाह आणि पेशावर झल्मीचा खेळाडू सिराजुद्दीन या दोघांना माजी क्रिकेटर रशीद लतीफने चाचणीसाठी इस्लामाबादला बोलावले होते. या दोन्ही क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या 'कामयाब जवान स्पोर्ट्स ड्राइव्ह' या टॅलेंट कार्यक्रमात भाग घेतला होता. यानंतर त्यांना कराची किंग्ज, लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान या तीन फ्रँचायझींच्या ऑफर मिळाल्या. मुलतान सुल्तान्सने इहसानुल्लाहला २०२२ मध्ये PSL मध्ये ड्राफ्ट केले होते.
मात्र, इहसानुल्लाह गेल्या वर्षी पाकिस्तान सुपर लीगमध्ये केवळ दोनच सामने खेळू शकला होता. पीएसएल २०२२ मधील पहिल्या सामन्यात त्याने कराची किंग्जविरुद्ध एक षटक टाकले होते. यानंतर लाहोर कलंदरविरुद्धच्या सामन्यात तो जखमी झाला.
लीडिंग विकेट टेकर
इहसानुल्लाहने पीएसएल २०२२ मध्ये पदार्पण केले तेव्हा तो १३८ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत असे. मात्र त्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीवर काम केले. सध्या तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे. इहसानुल्लाहने PSL 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक १० विकेट घेतल्या आहेत. त्याने क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध ५ विकेट्स, लाहोर कलंदर्स विरुद्ध २ विकेट्स आणि १७ फेब्रुवारी रोजी पेशावर झाल्मी विरुद्धच्या सामन्यात ३ बळी घेतले.