PSL 2023 Final : लाहोर-मुलतान फायनल रंगणार, भारतीय वेळेनुसार या चॅनेल-अॅपवर दिसणार सामना
LQ Vs MS PSL 2023 Final Live Streaming : पीएसएल २०२३ (LQ Vs MS PSL 2023 Final) चा अंतिम सामना लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान यांच्यात १८ मार्च रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
LQ Vs MS PSL 2023 Final : पाकिस्तान सुपर लीगचा (PSL 2023) अंतिम सामना आज (१८ मार्च) लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान या संघांमध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. मुलतान सुलतानने क्वालिफायर सामन्यात लाहोर कलंदर्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात पेशावर झाल्मीचा पराभव करून लाहोरने अंतिम फेरी गाठली.
ट्रेंडिंग न्यूज
मुलतानला बदला घेण्याची संधी
गेल्या वर्षी म्हणजेच पीएसएल २०२२ मध्येदेखील हेच दोन संघ फायनलमध्ये पोहोचले होते. त्यावेळी लाहोर कलंदरने मुलतान सुल्तानचा ४२ धावांनी पराभव करून पीएसलचे जेतेपद मिळवले होते. आता आज १८ मार्च रोजी हे दोन संघ आमनेसामने येतील, तेव्हा मुलतान सुलतान्सचा संघ गेल्या वर्षीच्या पराभवाचा बदल घेऊ इच्छितो.
पीएसएल फायनल केव्हा, कुठे आणि कसे पाहू शकता ते जाणून घ्या.
PSL 2023 फायनल किती वाजता सुरू होईल?
लाहोर कलंदर आणि मुलतान सुल्तान यांच्यातील फायनल सामना १८ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच ७ वाजता टॉस होईल.
PSL 2023 फायनल तुम्ही कोठे पाहू शकता?
लाहोर कलंदर आणि मुलतान सुल्तान यांच्यात पीएसएलची फायनल होणार आहे. हा सामना भारतातील क्रिकेट चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. याशिवाय, SONY LIV अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
दोन्ही संघ
मुलतान सुल्तान संघ:
मोहम्मद रिझवान (कर्णधार/विकेटकीपर), अब्बास आफ्रिदी, अन्वर अली, अराफत मिन्हास, शेल्ड्रॉन कॉट्रेल, टीम डेव्हिड, अकील हुसेन, इहसानुल्लाह, खुशदिल शाह, जोश लिटल, डेव्हिड मिलर, मोहम्मद इलियास, मोहम्मद सरवर, आदिल रशीद, रिले रुसो, समीन गुल, शाहनवाज दहानी, शान मसूद, उसामा मीर, उस्मान खान.
लाहोर कलंदर संघ:
शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, अहमद डॅनियल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, लियाम डॉसन, दिलबर हुसैन, फखर जमान, हारिस रौफ, शाई होप, हुसेन तलत, जलत खान, कामरान गुलाम, मिर्झा बेग रशीद खान, चावेझ इरफान, सिकंदर रझा, डेव्हिड व्हीजे, जमान खान.
संबंधित बातम्या