मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PSL 2023 : अरे देवा! PSL मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, सीसीटीव्ही, फायबर केबल, बॅटरी काहीच सोडलं नाही
psl 2023 gaddafi stadium stolen
psl 2023 gaddafi stadium stolen

PSL 2023 : अरे देवा! PSL मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, सीसीटीव्ही, फायबर केबल, बॅटरी काहीच सोडलं नाही

26 February 2023, 14:52 ISTRohit Bibhishan Jetnavare

psl 2023 gaddafi stadium : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2023) चोरीची घटना घडली आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमधील लाखोंचे सामान चोरट्यांनी पळवले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

जगातील सर्व लीग त्यांच्या खेळामुळे चर्चेत राहतात. या दरम्यान जगभरात खेळाडूंच्या खेळाची चर्चा होत असते. पण पाकिस्तान सुपर लीग दरवर्षी वेगळ्याच कारणांनी चर्चेत असते. आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL 2023) सामन्यांदरम्यान लक्ष ठेवण्यासाठी गद्दाफी स्टेडियममध्ये लावलेले ८ सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेले आहेत. 

लाखोंचा माल  चोरीला

कॅमेऱ्यांशिवाय स्टेडियमभोवती टाकलेली फायबर केबलही चोरीला गेली आहे. सोबतच, गद्दाफी स्टेडियमवर प्रकाशासाठी वापरण्यात येणाऱ्या जनरेटरच्या बॅटरीही गायब आहेत. या प्रकरणी स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी गुलबर्ग पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत. या दरम्यान चोरट्यांचे पळून जाताने सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेल्या मालाची किंमत लाखो रुपये आहे.

पोलीस तपास सुरू

स्टेडियमबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद झाली असून, यामध्ये चोरटे सामान घेऊन पळताना दिसत आहेत. यानंतर कथित आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून अधिकाऱ्यांच्या अधिकृत वक्तव्याचीही प्रतीक्षा आहे.