Pro Kabaddi 2024 : तेलुगू टायटन्सची जबरदस्त कामगिरी, टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा लाजिरवाणा पराभव
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi 2024 : तेलुगू टायटन्सची जबरदस्त कामगिरी, टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा लाजिरवाणा पराभव

Pro Kabaddi 2024 : तेलुगू टायटन्सची जबरदस्त कामगिरी, टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा लाजिरवाणा पराभव

Published Nov 18, 2024 10:19 PM IST

Pro Kabaddi 2024 : प्रो कबड्डी लीग च्या ६१ व्या सामन्यात आज (१८ नोव्हेंबर) तेलुगू टायटन्स आणि हरयाणा स्टीलर्स आमनेसामने होते. या सामन्यात टायटन्सने जबरदस्त कामगिरी करत टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा ४९-२७ असा लाजिरवाणा पराभव केला.

Pro Kabaddi 2024 : तेलुगू टायटन्सची जबरदस्त कामगिरी, टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा लाजिरवाणा पराभव
Pro Kabaddi 2024 : तेलुगू टायटन्सची जबरदस्त कामगिरी, टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा लाजिरवाणा पराभव

प्रो कबड्डी लीग च्या ६१ व्या सामन्यात आज (१८ नोव्हेंबर) तेलुगू टायटन्स आणि हरयाणा स्टीलर्स आमनेसामने होते. या सामन्यात टायटन्सने जबरदस्त कामगिरी करत टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा ४९-२७ असा लाजिरवाणा पराभव केला.

टायटन्सचा हा सहावा विजय असून ३२ गुणांसह ते सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. सलग ५ सामने जिंकून हरियाणाला पहिला पराभव पत्करावा लागला असला तरी ते अजूनही पहिल्या स्थानावर आहेत.

प्रो कबड्डी २०२४ च्या या सामन्यात आशिष नरवालने रेडिंगमध्ये तेलुगू टायटन्ससाठी सर्वाधिक ११ रेड पॉइंट घेतले आणि सागर आणि शंकर यांनी बचावात हाय फाइव्ह मिळवला. हरियाणा स्टीलर्सकडून राहुल सेटपालने सर्वाधिक ६ गुण घेतले. शादुलु आणि जय सूर्याने सामन्यात प्रत्येकी ५ गुण घेतले.

 पहिल्या हाफमध्येच हरियाणा दोनदा ऑल आऊट 

पहिल्या हाफनंतर तेलुगू टायटन्सने २३-११ अशी आघाडी घेतली. हरियाणा स्टीलर्सचे खाते मोहम्मदरेझा शाडलूने विजयला टॅकल करताना उघडले आणि तेलुगू टायटन्सला पहिला गुण आशिष नरवालने रेडिंगमधून मिळवला. दोन्ही संघांच्या बचावफळीने सुरुवातीपासून चांगला खेळ केला, परंतु टायटन्सने लवकरच सामन्यावर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली आणि स्टीलर्सला ऑलआऊटच्या दिशेने ढकलले.

७व्या मिनिटाला हरणाया पहिल्यांदा ऑलआऊट झाला. यानंतर १९व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सने हरियाणा स्टीलर्सला दुसऱ्यांदा ऑलआउट केले आणि यासह त्यांची आघाडीही वाढवली.

दुसऱ्या हाफमध्येही सुरुवातीला तेलुगू टायटन्सला पुन्हा एकदा हरियाणा स्टीलर्सला ऑल आऊट करण्याची संधी मिळाली होती, पण राहुलने आशिष नरवालवर सुपर टॅकल करत आपल्या संघाला दिलासा दिला. पण असे असतानाही टायटन्सने आपली आघाडी कमी होऊ दिली नाही आणि सामन्यात आपले स्थान कायम राखले. 

प्रो कबड्डी २०२४ च्या या सामन्यात २६व्या मिनिटाला टायटन्सने स्टीलर्सचा तिसऱ्यांदा ऑलआऊट केले आणि त्यांना सामन्यातून जवळपास बाहेर काढले. हरियाणाची बचावफळी आज काही खास करू शकली नाही आणि त्यामुळेच त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

आशिष नरवालने सामन्याच्या ३६व्या मिनिटाला तुफानी सुपर रेड करत संजय, विशाल आणि साहिलला बाद केले. यासोबतच प्रो कबड्डीने २०२४ मध्ये पहिला सुपर १० लगावला. ३७व्या मिनिटाला स्टीलर्स चौथ्यांदा ऑलआऊट झाले आणि यासह त्यांच्या सामन्यातील सर्व आशा संपुष्टात आल्या. शेवटी पवन सेहरावत याच्याविना टायटन्सने जबरदस्त विजयाची नोंद केली. हरियाणाला एकही गुण मिळाला नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या