प्रो कबड्डी लीग २०२४ च्या सातव्या सामन्यात आज (२१ ऑक्टोबर) युपी योद्धा आणि दबंग दिल्ली केसी आमनेसामने होते. हैदराबादच्या गच्चीबाउली इनडोअर स्टेडिमयमध्ये झालेल्या या सामन्यात युपीने दिल्लीचा २८-२३ असा पराभव केला.
यूपीने नवीन हंगामात विजयी सुरुवात केली, तर दिल्लीला पहिला पराभव स्वीकारावा लागला. युपीच्या बचावफळीने सामन्यात एकूण १३ गुण मिळवले आणि साहुल कुमारने हाय-५, मोहम्मरेझाने ३ गुण आणि सुमितने २ गुण मिळवले.
भवानी राजपूतने रेडिंगमध्ये यूपीसाठी सर्वाधिक ७ गुण मिळवले. तर दिल्लीसाठी एकही खेळाडू ५ गुणांच्या पुढे जाऊ शकला नाही. त्यांचा स्टार रेडर नवीन कुमार केवळ ४ गुण मिळवू शकला.
यूपीने पहिल्या हाफचा शेवट १२-११ अशा थोड्या आघाडीसह केला. हा अर्धा भाग पूर्णपणे बचावपटूंच्या नावावर होता. रेडिंगमध्ये यूपीने ५ गुण मिळवले, तर दिल्लीचे ४ गुण होते. मात्र, दिल्लीने बचावात ६ विरुद्ध ७ गुण घेतले. या हाफमध्ये दोन्ही संघांनी एकूण २३ गुण मिळवले, त्यापैकी १३ गुण बचावपटूंच्या नावावर होते.
पूर्वार्धात यूपीसाठी साहुल आणि दिल्लीच्या योगेशने बचावातून प्रत्येकी ३ गुण मिळवले. रेडिंगमध्ये यूपीच्या भवानी आणि दिल्लीच्या आशूने प्रत्येकी ३ गुण घेतले. एकूणच हा पहिला हाफ पूर्णपणे बरोबरी होता. कारण दोन्ही संघांनी सावध खेळ केला. या काळात नवीन मात्र बराच काळ बाहेर राहिला.
पहिल्या तीन मिनिटांत स्कोअर २-२ असा होता. त्यानंतर नवीनने साहुलला बाद करत स्कोअर ३-३ असा केला. त्यानंतर आशूने सुमितची शिकार करून दिल्लीला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. ओव्हरटेक करणे आणि मागे पडण्याचा सिलसिला २० मिनिटे संपेपर्यंत असाच चालू राहिला.
ब्रेकनंतरही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढाई सुरूच होती. डू ऑर डाय रेडवर आलेल्या आशिषला सुमितने बाद केले आणि एका क्षणी यूपीची आघाडी ३ अशी कमी केली. दिल्लीसाठी चिंतेची बाब म्हणजे आशू आणि नवीन बाहेर होते आणि ते सुपर टॅकल करण्याच्या स्थितीत होते.
मात्र, दिल्लीने नवीनला रिव्हाइव्ह केले आणि त्यांनी लवकरच स्कोअर बरोबर केला. दरम्यान, सुरेंदरने यूपीला पुन्हा पुढे नेले आणि नवीनने मल्टी-पॉइंट रेडसह दिल्लीला १६-१४ अशी आघाडी मिळवून दिली.
या दरम्यान, मोहम्मदरेझाने आशूविरुद्ध सुपर टॅकल करत स्कोर १६-१६ असा केला. मात्र, त्यानंतर यूपीने ३० मिनिटांच्या अखेरीस सलग दोन गुण मिळवत १८-१६ अशी आघाडी घेतली. पण चारचा डिफेन्स करताना आशिषने भवानीविरुद्ध चूक केली. यूपीकडे आता ३ गुणांची आघाडी होती. त्यानंतर सुमितने मोहितला करा किंवा मरोच्या रेडमध्ये बाद केले.
आता दिल्लीला ऑलआऊटचा धोका होता, ज्यात यूपीने २४-१८ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. ऑलआऊटनंतर दिल्लीने दोन गुणांसह पुनरागमन केले पण वेळ वेगाने जात होता. यूपीची आघाडी ५ होती. नवीनही बाहेर गेला होता. त्यानंतर साहूलने आशूची शिकार करून संघाचा विजय जवळपास निश्चित केला. यासह साहूलनेही हाय-५ पूर्ण केले. आशिषने शेवटच्या क्षणी सुपर रेडने स्कोअरलाइन बदलण्याचा प्रयत्न केला, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.