telugu titans vs bengaluru bulls 2024 : प्रो कबड्डी लीग २०२४ च्या ११ व्या मोसमाला आजपासून (१८ ऑक्टोबर) सुरुवात झाली. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तेलुगू टायटन्स संघाने बेंगळुरू बुल्स संघाचा ३७-२९ असा पराभव केला. टायटन्सने विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आणि यामध्ये कर्णधार पवन सेहरावत (१३ रेड पॉइंट)चे महत्त्वपूर्ण योगदान होते. तर बंगळुरुचा स्टार खेळाडू परदीप नरवाल (१४ रेडमध्ये ३ गुण) सुपर फ्लॉप ठरला.
तत्पूर्वी, तेलुगू टायटन्सने पहिल्या हाफमध्ये २०-११ अशी आघाडी घेतली. पवन सेहरावत आणि परदीप नरवाल यांनी पहिल्याच रेडमध्ये आपापल्या संघाची खाती उघडली. एकीकडे पवनची कामगिरी टायटन्ससाठी चांगलीच होती आणि त्याने रेडमध्ये सातत्याने गुण मिळवले.
तर दुसरीकडे, त्यांच्या डिफेंडर्सने बुल्सच्या रेडर्सना मोकळेपणाने खेळू दिले नाही. तसेचच, स्टार खेळाडू परदीप नरवालला दोनदा बाद केले. े
यानंतर बंगळुरू बुल्सने दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या बचावफळीने यात महत्त्वाची भूमिका बजावली. पवन सेहरावतला त्यांनी योग्य वेळी बाद केले. त्यामुळे तेलुगू टायटन्सवर ऑलआऊटचा धोका निर्माण होऊ लागला आणि दोन्ही संघांमधील फरकही लक्षणीयरीत्या कमी झाला. टायटन्स प्रथमच ३० व्या मिनिटाला ऑलआऊट झाला.
३० मिनिटे संपली तेव्हा टायटन्सकडे केवळ एक गुणांची आघाडी होती. पवनने मॅटवर परतल्यानंतर सुपर १० पूर्ण केला आणि प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या हंगामात सुपर १० मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला.े
बंगळुरू ऑलआऊट झाल्यानंतर टायटन्सने पुन्हा एकदा सामन्यावर ताबा मिळवत आघाडी वाढवली. टायटन्सच्या बचावफळीने पुन्हा जबाबदारी स्वीकारली आणि बुल्सच्या रेडर्सना लागोपाठ आऊट केले. अशा रितीने ३७व्या मिनिटाला बंगळुरू दुसऱ्यांदा ऑलआऊट झाले.
तेलुगू टायटन्सने नेत्रदीपक विजयाची नोंद करत विजयाचे अंतर ७ च्या वर ठेवले यामुळे बंगळुरू बुल्सला या सामन्यातून एकही गुण मिळाला नाही.
या सामन्यात टायटन्सच्याे कृष्णाने सर्वाधिक ६ टॅकल पॉइंट घेतले, तर बेंगळुरू बुल्ससाठी सुरिंदर सिंगने ५ गुण मिळवले.े