मराठी बातम्या  /  क्रीडा  /  प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटण नंबर वन, यू मूंबा कितव्या स्थानी? पाहा PKL 10 ची गुणतालिका

प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटण नंबर वन, यू मूंबा कितव्या स्थानी? पाहा PKL 10 ची गुणतालिका

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 31, 2023 01:14 PM IST

pro kabaddi league 2023 points table : प्रो कबड्डी लीगमध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला ५ गुण मिळतात. पराभूत संघाने पराभवाचे अंतर ७ किंवा त्यापेक्षा कमी ठेवल्यास पराभूत संघालाही १ गुण मिळेल. तर गुणतालिकेतील अव्वल ६ संघ थेट प्ले-ऑफसाठी पात्र ठरणार आहेत.

pro kabaddi league 2023
pro kabaddi league 2023 (PTI)

प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या हंगामाला २ डिसेंबर २०२३ पासून सुरुवात झाली. या लीगचा शेवटचा सामना २१ फेब्रुवारी २०२४ रोजी खेळवला जाईल.

विशेष म्हणजे, अनेक दोन मोसमानंतर आता पीकेएलचे सामने १२ वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत.  PKL 10 मधील लीग सामने अहमदाबाद, बंगळुरू, पुणे, चेन्नई, नोएडा, मुंबई, जयपूर, हैदराबाद, पाटणा, दिल्ली, कोलकाता आणि पंचकुला या १२ वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत.

प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला ५ गुण मिळतात. पराभूत संघाने पराभवाचे अंतर ७ किंवा त्यापेक्षा कमी ठेवल्यास पराभूत संघालाही १ गुण मिळेल. याशिवाय, सामना बरोबरी झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ३ गुण मिळतात. तर गुणतालिकेतील अव्वल ६ संघ थेट प्ले-ऑफसाठी पात्र ठरणार आहेत.

प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेतील टॉप ६ संघ

१) पुणेरी पलटण (गुण - ३१)

सामने -७

विजय - ६

पराभव - १

टाय - ००

२) जयपूर पिंक पँथर्स (२८ गुण)

सामने - ८

विजय - ४

पराभव - २

टाय - २

३) गुजरात जायंट्स (गुण - २८)

सामने - ८

विजय - ५

पराभव - ३

टाय - ००

४) हरियाणा स्टीलर्स (गुण - २६)

सामने - ७

विजय - ५

पराभव - २

टाय - ००

५) पाटणा पायरेट्स (गुण - २२)

 सामने - ८

 विजय - ४

 पराभव - ४

 टाय - ००

६) बंगाल वॉरियर्स (गुण - २२)

सामने - ८

विजय - ३

पराभव - ३

टाय - २

यानंतर यू मुंबा ७ व्या, यूपी योद्धास ८व्या, दबंग दिल्ली ९व्या, बंगळुरू बुल्स १०व्या, तामिळ थलायवास ११ व्या आणि तेलुगू टायटन्स १२व्या स्थानावर आहेत.

प्रो कबड्डी लीगची सर्वाधिक जेतेपदं कोणाच्या नावावर?

आत्तापर्यंत फक्त पटना पायरेट्सने प्रो कबड्डी लीगचे सर्वाधिक जेतेपदं पटकावली आहे. पटनाने तीन वेळा प्रो कबड्डी लीग जिंकली आहे. यानंतर जपपूर पिंक पँथर्सने दोनदा प्रो कबड्डी लीग जिंकली आहे. यानंतर यू मुंबा, बेंगळुरू बुल्स, बंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली केसी यांनी प्रत्येकी एकदा PKL जिंकली आहे. 

WhatsApp channel