Pro Kabaddi League : तेलुगू टायटन्स प्ले ऑफमधून बाहेर, बंगळुरू बुल्सने सामना सहज जिंकला-pro kabaddi league 2023 24 bengaluru bulls defeated telugu titans pkl 10 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi League : तेलुगू टायटन्स प्ले ऑफमधून बाहेर, बंगळुरू बुल्सने सामना सहज जिंकला

Pro Kabaddi League : तेलुगू टायटन्स प्ले ऑफमधून बाहेर, बंगळुरू बुल्सने सामना सहज जिंकला

Jan 19, 2024 10:11 PM IST

Pro Kabaddi League : प्रो कबड्डीमध्ये आज बंगळुरू बुल्स आणि तेलुगू टायटन्स आमनेसामने होते. या सामन्यात टायटन्सचा लाजिरवाणा पराभव झाला.

Pro Kabaddi League
Pro Kabaddi League

Pro Kabaddi League 2023-24 : प्रो कबड्डीमध्ये (Pro Kabaddi League 2023) आजपासून (१९ जानेवारी) हैदराबाद लेगची सुरुवात झाली. हैदराबाद लेगमधील आजच्या सामन्यात बेंगळुरू बुल्स आणि तेलुगू टायटन्स (Bengaluru Bulls vs Telugu Titans) आमनेसामने होते. या सामन्यात बंगळुरूने तेलुगू टायटन्सचा ४२-२६ असा धुव्वा उडवला.

या विजयासह बेंगळुरू बुल्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे तेलुगू टायटन्स अजूनही शेवटच्या स्थानावर असून त्यांच्या प्ले-ऑफच्या आशा संपल्या आहेत.

बेंगळुरू बुल्सकडून या सामन्यात अक्षितने सर्वाधिक ९ रेड पॉइंट्स घेतले आणि डिफेन्समध्ये सुरजीतने ७ टॅकल पॉइंट्स मिळवले. यानंतर सुरजीत आता पीकेएलच्या इतिहासात सर्वाधिक टॅकल पॉइंट मिळवण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर तेलुगू टायटन्ससाठी पवन सेहरावतने सर्वाधिक ७ रेड पॉइंट घेतले आणि डिफेन्समध्ये मोहितने ४ टॅकल पॉइंट्सची कमाई केली.

या सामन्यात तेलुगू टायटन्स तीनवेळा ऑलआऊट झाला. बेंगळुरू बुल्सने या सामन्यातून ५ गुण मिळवले तर तेलुगू टायटन्सला एकही गुण मिळवता आला नाही.

Whats_app_banner