Pro Kabaddi 2024 : रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, जयपूरने शेवटच्या क्षणी मारली बाजी
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi 2024 : रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, जयपूरने शेवटच्या क्षणी मारली बाजी

Pro Kabaddi 2024 : रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, जयपूरने शेवटच्या क्षणी मारली बाजी

Nov 17, 2024 10:55 PM IST

Pro Kabaddi 2024 : प्रो कबड्डी लीग २०२४ मध्ये आज पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स आमनेसामने होते. या सामन्यात पुणेरी पलटणचा थोडक्यात पराभव झाला.

Pro Kabaddi 2024 : रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, जयपूरने शेवटच्या क्षणी मारली बाजी
Pro Kabaddi 2024 : रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, जयपूरने शेवटच्या क्षणी मारली बाजी

प्रो कबड्डी लीग २०२४ मध्ये आज जयपूर पिंक पँथर्स आणि गतविजेते पुणेरी पलटण आमनेसामने होते. या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणचा ३०-२८ असा थरारक पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. पिंक पँथर्सचा १० सामन्यांनंतरचा हा ५वा विजय असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहेत. तर गतविजेता पुणेरी पलटणचा संघ ३४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

पहिल्या हाफनंतर जयपूर पिंक पँथर्सने १९-१२ अशी आघाडी घेतली. जयपूर पिंक पँथर्सने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि पुणेरी पलटणवर झटपट दडपण आणले. त्यांनी सहाव्या मिनिटालाच पहिल्यांदा पुणेरी पलटणला ऑलआऊट केले आणि सामन्यात आघाडी घेतली.

सामन्याची सुरुवात पुण्याच्या डिफेंडर्ससाठीही फारशी चांगली झाली नाही. तर त्यांचे रेडर्सही अजिबात लयीत दिसले नाहीत. 

यानंतर दुसऱ्या हाफमध्ये स्कोअर करण्याचा वेग तितकासा नव्हता आणि पुन्हा एकदा रेडर्सपेक्षा बचावफळीचा बोलबोला दिसला. अंकुशने ५ टॅकल पॉइंट पूर्ण केले आणि प्रो कबड्डी २०२४ मधील आपला पहिला हाय फाईव्ह पूर्ण केला. आकाश शिंदेने योग्य वेळी सुपर रेड करत पिंक पँथर्सच्या अंकुश, नीरज नरवाल आणि सुरजित सिंगला बाद केले. या हाफच्या शेवटी जयपूरकडे केवळ दोन गुणांची आघाडी होती.

३६व्या मिनिटाला पुण्याने जयपूरचा कर्णधार अर्जुनला टॅकल केले आणि सामन्यात स्वत:साठी मोठी संधी निर्माण केली. अखेरीस, सामना अतिशय रोमांचक झाला. परंतु ३९व्या मिनिटाला रजा मिरबाघेरीने व्ही अजित कुमारला शानदारपणे टॅकल करून जयपूरची स्थिती मजबूत केली. 

आकाश शिंदे मॅचचा शेवटचा रेड करायला आला होता, पण अंकुशने त्याला चपखलपणे टॅकल केले. यासह जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी २०२४ चा हा सामना जिंकला.

पुणेरी पलटणने जोरदार पुनरागमन केले, पण सुरुवातीला त्यांनी केलेला खराब खेळ त्यांच्या विरोधात गेला. त्यांना अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागले. जयपूर पिंक पँथर्ससाठी प्रो कबड्डी २०२४ च्या या सामन्यात, अर्जुन देशवालने रेडिंगमध्ये सर्वाधिक ८ रेड पॉइंट घेतले आणि अंकुश राठीने बचावात ६ टॅकल पॉइंट घेतले. तर पुणेरी पलटणसाठी आकाश शिंदेने ७ रेड पॉइंट घेतले आणि बचावात गौरव-अमानने प्रत्येकी ३ टॅकल पॉइंट घेतले.

Whats_app_banner