मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi : सलग ५ विजयानंतर यू मुंबाचा होम ग्राउंडवर पराभव, जयपूरनं सहज उडवला धुव्वा

Pro Kabaddi : सलग ५ विजयानंतर यू मुंबाचा होम ग्राउंडवर पराभव, जयपूरनं सहज उडवला धुव्वा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 06, 2024 10:11 PM IST

Pro Kabaddi 2023-2024 : जयपूर पिंक पँथर्सचा हा या स्पर्धेतील सहावा विजय असून गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत तर यू मुंबा अजूनही पाचव्या स्थानावर आहे.

Pro Kabaddi
Pro Kabaddi

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi 2023-2024) आज (६ जानेवारी) यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स (U Mumba vs Jaipur Pink Panthers) आमनेसामने होते. स्पर्धच्या ५८व्या सामन्यात जयपूरने यू मुंबाचा ४१-३१ असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, या सामन्यात जयपूरने पुन्हा एकदा राहुल चौधरीला प्लेइंग ७ मधून वगळले होते.

जयपूर पिंक पँथर्सचा हा या स्पर्धेतील सहावा विजय असून गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत तर यू मुंबा अजूनही पाचव्या स्थानावर आहे.

जयपूर पिंक पँथर्ससाठी या सामन्यात अर्जुन देशवालने सर्वाधिक १७ रेड पॉइंट घेतले आणि अंकुश राठीने डिफेन्समध्ये ५ टॅकल पॉइंट मिळवले. तर दुसरीकडे, यू मुंबासाठी गुमान सिंगने १३ रेड पॉइंट्सची कमाई केली तर डिफेन्समध्ये सोंबीर, महेंद्र सिंग आणि सुरिंदर सिंगने प्रत्येकी १ टॅकल पॉइंट घेतला.

सामन्यात अखेरिस यू मुंबाने पराभवाचे अंतर ७ पर्यंत कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. जयपूर पिंक पँथर्सने शानदार विजय नोंदवला आणि ५ गुणांची कमाई केली तर यू मुंबाला या सामन्यातून एकही गुण मिळाला नाही. सलग ५ सामने जिंकल्यानंतर मुंबईचा हा पहिलाच पराभव असून त्यांच्या विजयाची मालिका खंडित झाली आहे.

WhatsApp channel