प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi 2023-24) आज तामिळ थलायवाज आणि युपी योद्धाज (up yoddhas vs tamil thalaivas) आमनेसामने होते. या सामन्यात तामिळ थलायवाजने युपीचा ४६-२७ असा सहज धुव्वा उडवून आपल्या सलग ७ पराभवांची मालिका खंडित केली.
पण या विजयानंतरही PKL च्या गुणतालिकेत फारसा बदल झालेला नाही. युपी अजूनही १० व्या स्थानावर आहे. तर तामिळ थालायवाज ११व्या स्थानावर आहे.
या सामन्यात तामिळ थलायवाससाठी नरेंद्र कंडोलाने सुपर १० आणि सागर राठीने हाय फाईव्ह मारला. तर यूपी योद्धाकडून विजय मलिकने १० रेड पॉइंट्स आणि डिफेन्समध्ये सुमित सांगवानने ३ टॅकल पॉइंट मिळवले.
पहिल्या हाफमध्येच तमिळ थलायवासने १९-११ अशी आघाडी घेतली होती. परदीप नरवाल त्याच्या पहिल्या दोन्ही रेडमध्ये बाद झाला. थलायवासच्या रेडर्सनी जबरदस्त कामगिरी करून यूपीवर दबाव आणला. यासह त्यांनी सातव्या मिनिटाला पहिल्यांदा युपीला ऑलआऊट केले. आजच्या सामन्यात परदीप नरवालने अतिशय निराशाजनक कामगिरी केली. तामिळ थलायवाजच्या डिफेंडर्सनी त्याला सतत बाद केले.
यानंतर ३९व्या मिनिटाला यूपी योद्धा तिसऱ्यांदा ऑलआऊट झाला आणि तमिळ थलायवासने सामना सहज जिंकला. थलायवाजने सामन्यात महत्त्वाचे ५ गुण मिळवले. दुसरीकडे, सर्व प्रयत्न करूनही, यूपी योद्धासला एकही गुण मिळवता आला नाही.
संबंधित बातम्या