प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi 2023-24) नोएडा (युपी) लेगमधील सामने २९ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान खेळले गेले. या टप्प्यात एकूण ११ सामने झाले.
प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण संघाने आतापर्यंत ९ पैकी सर्वाधिक ८ सामने जिंकले असून ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. गुजरात जायंट्स संघ दुसऱ्या स्थानावर तर जयपूर पिंक पँथर्स तिसऱ्या स्थानावर आहे.
पीकेएल १० च्या पाचव्या आठवड्यातील, होम टीम संघ यूपी योद्धाच्या डिफेन्स टीमने चांगली कामगिरी केली.पण त्यांना ४ सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. अशा स्थितीत गेल्या आठवड्यात म्हणजेच, युपी लेगमध्ये सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मिळवणाऱ्या डिफेंडर खेळाडूंमध्ये कोण कोण आहे, हे आपण पाहणार आहोत.
प्रो कबड्डीच्या युपी लेगमध्ये होम टीम युपी योद्धासने ४ सामन्यात एक विजय मिळवला. त्यांचा मुख्य डिफेंडर सुमितने ४ सामन्यांमध्ये ३ हाय फाइव्ह सह सर्वाधिक २० टॅकल पॉइंट मिळवले. बेंगळुरू बुल्सविरुद्ध सुमितने ५ टॅकल पॉइंट मिळवले, तर दबंग दिल्लीविरुद्ध सुमितने ७ टॅकल पॉइंटची कमाई केली होती.
यानंतर सुमितला पाटणा पायरेट्सविरुद्ध केवळ २ टॅकल पॉइंट घेता आले. पण यानंतर सुमितने चांगले पुनरागमन केले आणि शेवटच्या साखळी सामन्यात पुणेरी पलटणविरुद्ध ६ टॅकल पॉइंट्सची कमाई केली.
यूपी लेगमध्ये पुणेरी पलटणचा प्रमुख खेळाडू मोहम्मदरेझा शाडलूनेदेखील चांगली कामगिरी केली. त्याने २ सामन्यात हाय फाइव्ह ९ टॅकल पॉइंट घेतले. तेलुगु टायटन्स विरुद्ध त्याने ४ तर यूपी योद्धाविरुद्ध मोहम्मदरेझाने हाय फाइव्हसह ५ पॉइंट्सची कमाई केली.
पटना पायरेट्सचा मुख्य डिफेंडर कृष्णा धुल याने देखील यूपी लेगमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने त्याने २ सामन्यात हाय फाइव्ह ९ टॅकल पॉइंट घेतले. कृष्णा धुलने हरियाणा स्टीलर्सविरुद्ध ५ टॅकल गुण घेतले, त्यानंतर यूपी योद्धाविरुद्ध ४ टॅकल पॉइंट्स मिळवले.