Pro Kabaddi : हरियाणा स्टीलर्सची टॉप ५ मध्ये एन्ट्री, आज तामिळ थलायवाजला चारली धूळ-pro kabaddi 2023 24 haryana steelers defeated tamil thalaivas todays pkl 10 match ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi : हरियाणा स्टीलर्सची टॉप ५ मध्ये एन्ट्री, आज तामिळ थलायवाजला चारली धूळ

Pro Kabaddi : हरियाणा स्टीलर्सची टॉप ५ मध्ये एन्ट्री, आज तामिळ थलायवाजला चारली धूळ

Jan 14, 2024 09:46 PM IST

Pro Kabaddi 2023-24 : या विजयासह स्टीलर्स गुणतालिकेत ५व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर तामिळ थलायवास अजूनही ११व्या स्थानावर आहेत.

Pro Kabaddi
Pro Kabaddi

Pro Kabaddi 2023 : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi 2023-24) आज (१४ जानेवारी) हरियाणा स्टीलर्स आणि तमिळ थलायवाज (Haryana Steelers vs Tamil Thalaivas)आमनेसामने होते. पीकेएलच्या या ७१ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने तमिळ थलायवासचा ३६-३१ असा पराभव केला.

या विजयासह स्टीलर्स गुणतालिकेत ५व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर तामिळ थलायवास अजूनही ११व्या स्थानावर आहेत.

हरियाणा स्टीलर्सकडून या सामन्यात, विनयने सर्वाधिक १० रेड पॉइंट्स घेतले आणि डिफेन्समध्ये कर्णधार जयदीप आणि राहुल सेटपालने ५-५ टॅकल पॉइंट्स मिळवले. तर तामिळ थलायवाससाठी अजिंक्य पवारने ६ रेड पॉइंट्स आणि सागर राठीने डिफेन्समध्ये ५ टॅकल पॉइंट्स घेतले.

PKL 10 चे गुणतालिकेतील टॉप ६ संघ

१) पुणेरी पलटण  (गुण - ५६)

सामने - १२, विजय - १०, पराभव - २, टाय- ००

२) जयपूर पिंक पँथर्स (गुण - ४८)

सामने - १२, विजय - ८, पराभव - २, टाय - २,

३) दबंग दिल्ली केसी (गुण - ४०)

सामने - ११, विजय - ७, पराभव - ३, टाय - १, 

४) गुजरात जायंट्स  (गुण - ३९)

सामने - १२, विजय - ७, पराभव - ५, टाय - ००,

५) हरियाणा स्टीलर्स  (गुण - ३९)

सामने - १२, विजय - ७, पराभव - ४, टाय - १,

६) यू मुंबा (गुण - ३५)

सामने - ११, विजय - ६, पराभव - ४, टाय - १,

 

Whats_app_banner