प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi 2023-2024) आज (१२ जानेवारी) जयपूर पिंक पँथर्स आणि तेलगू टायटन्स आमने सामने होते. या सामन्यात जयपूरने टायटन्सचा ३८-३५ असा पराभव केला. या विजयासह जयपूर पिंक पँथर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून तेलुगू टायटन्स अजूनही शेवटच्या स्थानावर आहे.
गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्ससाठी आजच्या सामन्यात अर्जुन देशवालने सुपर १० सह १४ रेड पॉइंट्स मिळवले आणि डिफेन्समधअये रेझा मिरबाघेरीने हाय फाइव्ह ५ टॅकल गुण मिळवले. तर तेलुगू टायटन्ससाठी पवन सेहरावतने रेडिंगमध्ये १० आणि संदीप धुलने डिफेन्समध्ये ५ टॅकल पॉइंट्सची कमाई केली.
या सामन्यात जयपूरने ५ गुण कमावले तर तेलुगू टायटन्सला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. कर्णधार पवन सेहरावतची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ गेली. त्याने सामन्यात १० रेड आणि २ टॅकल पॉइंट घेतले.