मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi : पुणेरी पलटणची सलग ८ विजयांची मालिका खंडीत, रोमहर्षक सामन्यात जयपूरने उडवला धुव्वा

Pro Kabaddi : पुणेरी पलटणची सलग ८ विजयांची मालिका खंडीत, रोमहर्षक सामन्यात जयपूरने उडवला धुव्वा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 13, 2024 10:13 PM IST

Pro Kabaddi 2023-2024 : या सामन्याच्या निकालामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झाला नाही. पुणे अजूनही पहिल्या तर जयपूर दुसऱ्या स्थानावर आहे.

Pro Kabaddi
Pro Kabaddi

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi 2023-2024) आज (१३ जानेवारी) जयपूर पिंक पँथर्स आणि पुणेरी पलटण (Jaipur Pink Panthers vs Puneri Paltan) आमनेसामने होते. या सामन्यात जयपूरने पुणेरी पलटणचा ३६-३४ असा धुव्वा उडवला. या विजयासह जयपूरने पुणेरी पलटणची सलग ८ विजयांची मालिका खंडीत केली.

या सामन्याच्या निकालामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झाला नाही. पुणे अजूनही पहिल्या तर जयपूर दुसऱ्या स्थानावर आहे.

PKL 10 च्या या सामन्यात अर्जुन देशवालने सर्वाधिक १६ रेड पॉइंट्स घेतले आणि कर्णधार सुनील कुमारने डिफेन्समध्ये ५ टॅकल पॉइंट घेतले. तर पुणेरी पलटणसाठी अस्लम इनामदारने ८ राइड पॉइंट आणि डिफेन्समध्ये मोहम्मदरेझा शादलू आणि गौरव खत्रीने प्रत्येकी २ टॅकल पॉइंट घेतले.

विशेष म्हणजे, या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा स्टार रेडर अर्जुन देशवालने इतिहास रचला आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये आपले ८०० रेड पॉइंट्स पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो ९वा रेडर ठरला आहे.

दरम्यान, जयपूरने ५ गुण कमावले तर पुणेरी पलटणला अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागले.

WhatsApp channel