Pro Kabaddi : प्रो कबड्डीचे एक हजार सामने पूर्ण, ऐतिहासिक लढतीत बंगालने उडवला बंगळुूरूचा धुव्वा-pro kabaddi 1000 match bengal warriors defeated bengaluru bulls historical clash pro kabaddi 2023 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi : प्रो कबड्डीचे एक हजार सामने पूर्ण, ऐतिहासिक लढतीत बंगालने उडवला बंगळुूरूचा धुव्वा

Pro Kabaddi : प्रो कबड्डीचे एक हजार सामने पूर्ण, ऐतिहासिक लढतीत बंगालने उडवला बंगळुूरूचा धुव्वा

Jan 15, 2024 10:06 PM IST

Pro Kabaddi : या विजयासह बंगाल संघ ३८ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे तर बेंगळुरू बुल्स ९व्या स्थानावर कायम आहे.

Pro Kabaddi 2023
Pro Kabaddi 2023

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi 2023 ) आज (१५ जानेवारी) बंगाल वॉरियर्स आणि बेंगळुरू बुल्स (Bengal Warriors vs Bengaluru Bulls) यांच्यात खेळला गेला. हा सामना अतिशय रोमांचक झाला. शेवटी या सामन्यात बंगालने ३५-२९ अशा फरकाने बंगळुरूचा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील १ हजारवा सामना होाता.

या विजयासह बंगाल संघ ३८ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे तर बेंगळुरू बुल्स ९व्या स्थानावर कायम आहे.

अनूप कुमार, मनजीत छिल्लर, अजय ठाकूर, धर्मराज चेरलाथन आणि रिशांक देवाडिगा यांसारख्या दिग्गजांनी PKL च्या १००० व्या सामन्याला उपस्थिती लावली. या खास निमित्ताने या खेळाडूंचा गौरवदेखील करण्यात आला.

या सामन्यात बंगाल वॉरियर्सकडून मनिंदर सिंगने सर्वाधिक ९ रेड पॉइंट घेतले आणि शुभम शिंदेने डिफेन्समध्ये ७ टॅकल पॉइंट मिळवले. तर बेंगळुरू बुल्ससाठी भरत हुडाने १० रेड पॉइंट्स घेतले आणि डिफेन्समध्ये सुरजित सिंगने ४ टॅकल पॉइंट घेतले.

बंगालने हा सामना जिंकून ५ महत्त्वाचे गुण मिळवले तर बेंगळुरू बुल्सला या सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले.

Whats_app_banner