सुवर्णपदक जिंकणाऱ्या नवदीपसाठी पंतप्रधान मोदी जमिनीवर बसले, त्यानंतर दिला ऑटोग्राफ, व्हिडिओ पाहा-prime minister narendra modi meets paralympian pm modi meets gold medalist navdeep singh video ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  सुवर्णपदक जिंकणाऱ्या नवदीपसाठी पंतप्रधान मोदी जमिनीवर बसले, त्यानंतर दिला ऑटोग्राफ, व्हिडिओ पाहा

सुवर्णपदक जिंकणाऱ्या नवदीपसाठी पंतप्रधान मोदी जमिनीवर बसले, त्यानंतर दिला ऑटोग्राफ, व्हिडिओ पाहा

Sep 13, 2024 10:43 AM IST

दिल्लीचा पॅरा ॲथलीट आणि भालाफेक सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगसोबत पंतप्रधानांची भेट खूपच अनोखी होती, या भेटीत पंतप्रधान नवदीपसोबत विनोद करताना दिसले. हा विनोद ऐकून शेजारी उभे असलेले खेळाडूही हसू लागले.

सुवर्णपदक जिंकणाऱ्या नवदीपसाठी पंतप्रधान मोदी जमिनीवर बसले, त्यानंतर दिला ऑटोग्राफ, व्हिडिओ पाहा
सुवर्णपदक जिंकणाऱ्या नवदीपसाठी पंतप्रधान मोदी जमिनीवर बसले, त्यानंतर दिला ऑटोग्राफ, व्हिडिओ पाहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१२ सप्टेंबर) पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. या खास प्रसंगी पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

दिल्लीचा पॅरा ॲथलीट आणि भालाफेक सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगसोबत पंतप्रधानांची भेट खूपच अनोखी होती, या भेटीत पंतप्रधान नवदीपसोबत विनोद करताना दिसले. हा विनोद ऐकून शेजारी उभे असलेले खेळाडूही हसू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पीएम मोदी आणि नवदीप यांचा खास क्षण व्हायरल झाला

नवदीपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत आणखी एक खास क्षण आला, जेव्हा नवदीपने पंतप्रधानांना टोपी दिली. टोपी घालण्यासाठी पंतप्रधान स्वत: चक्क जमिनीवर बसले, जेणेकरून नवदीपला कॅप आरामात घालता येईल.

हा खास क्षण पाहून तेथील वातावरण थोडेसे भावनिक झाले होते. यानंतर नवदीपने पंतप्रधानांना ऑटोग्राफ मागितला. नवदीपने ज्या हाताने भाला फेकला त्याच हातावर पंतप्रधान मोदींनी स्वाक्षरी केली.

भेटीदरम्यान पीएम मोदींनी नवदीपला गंमतीने विचारले, 'तुला एवढा राग का येतो?' यावर नवदीपने हसून उत्तर दिले की, मी देशासाठी पदक जिंकण्याचे वचन दिले होते आणि आता ते वचन पूर्ण करून परतलो आहे.

नवदीप सिंग पक्का दिल्लीकर

नवदीप सिंगचे नाव केवळ पदक जिंकल्यामुळेच नव्हे तर त्याच्या अनेक मजेदार, अनोख्या उपक्रमांमुळे आणि मैदानातील आक्रमकेमुळेदेखील चर्चेत राहिले. पॅरालिम्पिकदरम्यान, त्याच्या आक्रमक उत्साहाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले, त्यातील काही व्हायरलही झाले.

विशेषत: भाला फेकल्यानंतर नवदीपने विराट कोहली स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले होते. यावेळी त्याने उत्साहात शिवीही दिली. तेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

नवदीपने ४७.३२ मीटरचा जबरदस्त थ्रो केला

दरम्यान, नवदीपने पॅरालिम्पिकमध्ये ७ सप्टेंबर रोजी पुरुषांच्या भालाफेक F41 च्या अंतिम फेरीत ४७.३२ मीटरचा जबरदस्त थ्रो केला होता, त्यानंतर तो खूप आक्रमक दिसला. यानंतर एका मुलाखतीत नवदीपला त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो हसला आणि म्हणाला की, मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता.

यानंतर नवदीपने त्याच्या प्रशिक्षकाला विचारले, "मी खरोखरच माझा विक्रम मोडला का?" आणि गमतीने प्रशिक्षकाला म्हणाला, "खाओ मां कसम."

Whats_app_banner