Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक, उंच उडीत प्रवीण कुमारने रचला इतिहास-praveen kumar clinches gold in mens high jump at paralympics with 2 08m effort ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक, उंच उडीत प्रवीण कुमारने रचला इतिहास

Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक, उंच उडीत प्रवीण कुमारने रचला इतिहास

Sep 06, 2024 05:12 PM IST

प्रवीण कुमार हा पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मरियप्पन थंगावेलू नंतर दुसरा भारतीय ठरला. तसेच, पॅरालिम्पिकच्या इतिहासातील उंच उडी स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे ११ वे पदक आहे.

Praveen Kumar Gold medal in Paralympics : भारताला सहावं सुवर्णपदक, उंच उडीत प्रवीण कुमारने रचला इतिहास
Praveen Kumar Gold medal in Paralympics : भारताला सहावं सुवर्णपदक, उंच उडीत प्रवीण कुमारने रचला इतिहास (REUTERS)

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या प्रवीण कुमार याने उंच उडीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. आज (६ सप्टेंबर) पॅरालिम्पिकचा ९ वा दिवस आहे. २१ वर्षीय प्रवीण कुमारने उंच उडीच्या T64 इव्हेंटमध्ये २.०८ मीटरच्या उत्कृष्ट उंच उडीसह सुवर्णपदक जिंकले.

विशेष म्हणजे प्रवीण कुमार हा पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मरियप्पन थंगावेलू नंतर दुसरा भारतीय ठरला. तसेच, पॅरालिम्पिकच्या इतिहासातील उंच उडी स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे ११ वे पदक आहे.

प्रवीणने USA आणि उझबेकिस्तानच्या च्या खेळाडूंना हरवलं

उंच उडीच्या T64 इव्हेंटमधील फायनलमध्ये प्रवीण कुमारने अमेरिका आणि उझबेकिस्तानच्या पॅरा ऍथलीट्सचा पराभव केला. प्रवीणने २.०८ मीटर उंच उडी मारली, तर अमेरिकन पॅरा ॲथलीट डेरेक लोकिडेंटने २.०६ मीटर उंच उडी मारून रौप्यपदक जिंकले.

उझबेकिस्तानच्या तेमुरबेक गियाझोव्हने २.०३ मीटर उडी मारून कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले. प्रवीण कुमारने यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

प्रवीण कुमारने सुवर्णपदक जिंकल्यामुळे पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण १९ पदके जिंकली होती, ज्यामध्ये ५ सुवर्ण पदकांचा समावेश होता.

भारताच्या झोळीत आतापर्यंत २६ पदकं

यावेळच्या म्हणजेच पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत २६ पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. यात भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. अवनी लखेरा, नितेश कुमार, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, धरमबीर आणि प्रवीण कुमार यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.

पॅरालिम्पिकच्या उंच उडीमध्ये यापूर्वी मरियप्पन थंगावेलू याने सुवर्णपदक जिंकले होते. आता पॅरालिम्पिकच्या उंच उडीमध्ये सुवर्णपदक पदक जिंकणारा प्रवीण कुमार हा दुसरा भारतीय ठरला आहे.

उंच उडीत भारताचे दुसरे सुवर्णपदक

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील प्रवीण हा मरियप्पन हा पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा थंगावेलू नंतरचा दुसरा भारतीय पॅरा ॲथलीट आहे. 

या विजयासह प्रवीण कुमार पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत पदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी शरद कुमारने रौप्यपदक जिंकले होते, तर मरियप्पनने पुरुषांच्या T63 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

Whats_app_banner