ऑलिम्पिक पदकांची क्लालिटी खराब, काहींची पदकं तुटलेली तर काहींचा रंग उडून गेला, खेळाडूंनी व्यक्त केला संताप-poor quality chipped losing shine paris olympic medals deteriorate after just one week ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ऑलिम्पिक पदकांची क्लालिटी खराब, काहींची पदकं तुटलेली तर काहींचा रंग उडून गेला, खेळाडूंनी व्यक्त केला संताप

ऑलिम्पिक पदकांची क्लालिटी खराब, काहींची पदकं तुटलेली तर काहींचा रंग उडून गेला, खेळाडूंनी व्यक्त केला संताप

Aug 10, 2024 05:56 PM IST

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील काही खेळाडूंच्या पदकांचा रंग उडून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनच्या यास्मिन हार्पर आणि एका अमेरिकन स्केटबोर्डर यांची पदकं खराब क्वालिटीच्या असल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

ऑलिम्पिक पदकांची क्लालिटी खराब, काहींची पदकं तुटलेली तर काहींचा रंग उडून गेला, खेळाडूंनी व्यक्त केला संताप
ऑलिम्पिक पदकांची क्लालिटी खराब, काहींची पदकं तुटलेली तर काहींचा रंग उडून गेला, खेळाडूंनी व्यक्त केला संताप

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये एकापाठोपाठ एक नवे वाद निर्माण होत आहेत. आता ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकावरून वाद निर्माण झाला आहे. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचा रंग उडून जात असल्याचे समोर आले आहे. 

ब्रिटनची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती यास्मिन हार्पर हिने दावा केला आहे की तिच्या पदकाचा रंग निघून गेला आहे. महिलांच्या १०० मीटर सिंक्रोनाइझ स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत तिला हे पदक मिळाले होते. 

यानंतर अमेरिकेच्या स्केटबोर्ड टीमच्या सदस्यानेही अशीच तक्रार केली आहे. आपल्या कांस्यपदकाचा रंग फिका होता आणि तो मागच्या बाजूला तुटल्याचेही त्याने सांगितले.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत अनेक एक वाद निर्माण झाले आहेत. यापूर्वी महिला बॉक्सिंगमध्ये दोन खेळाडूंच्या लिंगावरून वाद झाला होता. सध्या विनेश फोगटच्या वजनावरून वाद सुरू आहे. पॅराग्वेच्या जलतरणपटूची ऑलिम्पिक व्हिलेजमधून हकालपट्टी करण्यात आली. अशी अनेक प्रकरणे या स्पर्धेत समोर आली. 

पण ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पदकांचा रंग उडून जाणे हा सर्वात मोठा धक्का आहे. पदकं ही खेळाडूंच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रतीक असतात. अशा स्थितीत खराब पदक मिळणे निराशाजनक आहे. या प्रकरणामुळे पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

खराब क्लालिटीच्या पदकाबाबत यास्मीन हार्पर म्हणाली की, 'हे थोडे निराशाजनक आहे कारण ते फक्त १ आठवडा चमकदार दिसत होते,' यास्मिन हार्पर पुढे म्हणाली. हे कांस्यपदक असले तरी त्याचे स्वत:चे महत्त्व आहे. यामुळे काही झाले तरी तिला फारसा फरक पडत नसल्याचे तिने सांगितले. 

दुसरीकडे अमेरिकन ॲथलीटने सांगितले की, तिचे कांस्यपदक मागच्या बाजूला तुटले आहे आणि हळूहळू त्याचा रंग उडून जात आहे.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजक रंग उडालेली पदकं बदलून देतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पदकविजेत्यांनी त्यांना औपचारिकपणे विनंती केल्यास त्याची दखल घेणे अपेक्षित आहे. 

मात्र, पदक जरी नवे मिळाले तरी, त्या पदकाला या जुन्या पदकाप्रमाणे ग्लॅमर मिळणार नाही. कारण ते हजारो लोकांच्या टाळ्या आणि शुभेच्छांदरम्यान रंगमंचावर प्रदान करण्यात आले होते.