मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravindra Jadeja: वाह जड्डू! जडेजा पती-पत्नीचा दिलदारपणा, पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

Ravindra Jadeja: वाह जड्डू! जडेजा पती-पत्नीचा दिलदारपणा, पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 09, 2022 05:01 PM IST

Ravindra Jadeja and PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि त्याच्या पत्नीचे कौतुक केले आहे. जडेजा आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या मुलीच्या ५ व्या वाढदिवसाला १०१ मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाती उघडण्याचे काम केले आहे. या कामाबद्दल पीएम मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा या दोंघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. जडेजा पती-पत्नीने मुलीच्या वाढदिवसानिमित्त वंचित मुलींना मदत करण्याचे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांनी जामनगर पोस्ट ऑफिसमध्ये १०१ सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत. हा उपक्रम त्यांनी त्यांची मुलगी कुंवारीबाश्री निध्यना हिच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त केला आहे.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांद्वारा लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पोस्ट ऑफिसमध्येतुम्ही वंचित मुलींसाठी १०१ सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत. तुमचा हा निर्णय खूपच कौतुकास्पद असून या यामुळे मला आनंद झाला. तुमची मुलगी निध्यना हिचा ५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक खात्यात सुरुवातीची रक्कम जमा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. तुम्ही समाजाच्या भल्यासाठी योगदान देत राहा. अशा स्वयंसेवी प्रयत्नांमुळे समाजात एक सकारात्मक संदेश निर्माण होईल आणि सर्वांना प्रेरणा मिळेल."

या पत्रानंतर रविद्र जडेजाने ही ट्वीट करुन पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. जडेजाने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींसह दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांचेही आभार मानले आहेत.

जड्डूची पत्नी रिवाबा जडेजा ही अनेकदा जामनगर पोस्ट ऑफिसमध्ये दिसते. ती परिसरातील वंचित मुलींच्या कल्याणासाठी काम करत आहे. रिवाबाने १०१ सुकन्या खात्यांमध्ये प्रत्येकी ११ हजार रुपये जमा केले आहेत. यापूर्वी कोविड-19 महामारीच्या काळातही गरजू कुटुंबांना मदत केल्याबद्दल जडेजाचेही कौतुक करण्यात आले होते. त्यावेळीही एक पत्र लिहून पंतप्रधान मोदींनी जडेजा आणि त्यांच्या पत्नीच्या सामाजिक कल्याणासाठी देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले होते.

WhatsApp channel