PKL 11 : सलग ४ सामने हरल्यानंतर परदीप नरवालच्या संघाचा पहिला विजय, दबंग दिल्लीने शेवटच्या क्षणी सामना गमावला
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PKL 11 : सलग ४ सामने हरल्यानंतर परदीप नरवालच्या संघाचा पहिला विजय, दबंग दिल्लीने शेवटच्या क्षणी सामना गमावला

PKL 11 : सलग ४ सामने हरल्यानंतर परदीप नरवालच्या संघाचा पहिला विजय, दबंग दिल्लीने शेवटच्या क्षणी सामना गमावला

Oct 29, 2024 11:10 PM IST

Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीग २०२४ मध्ये बंगळुरू बुल्सने पहिला विजय मिळवला आहे. त्यांनी आज दबंग दिल्लीचा एका गुणाने पराभव केला.

PKL 11 : सलग ४ सामने हरल्यानंतर परदीप नरवालच्या संघाचा पहिला विजय, दबंग दिल्लीने शेवटच्या क्षणी सामना गमावला
PKL 11 : सलग ४ सामने हरल्यानंतर परदीप नरवालच्या संघाचा पहिला विजय, दबंग दिल्लीने शेवटच्या क्षणी सामना गमावला

प्रो कबड्डी लीग २०२४ मध्ये आज मंगळवारी (२९ ऑक्टोबर) दबंग दिल्ली आणि बेंगळुरू बुल्स आमनेसामने होते. या सामन्यात बंगळुरूने दिल्लीचा ३४-३३ असा थरारकरित्या पराभव केला. यासह बंगळुरू बुल्सने या मोसमातील त्यांचा पहिला विजय नोंदवला आहे.

बेंगळुरू बुल्सकडून जय भगवान याने एकहाती सामना फिरवला आणि ११ गुण मिळवले. याशिवाय परदीप नरवाल यानेही ७ गुण घेतले. तर दबंग दिल्लीकडून आशु मलिकने सर्वाधिक १३ गुण मिळवले.

जय भगवानने एकहाती सामना फिरवला

रेडर्स फ्लॉप झाल्यानंतर, प्रशिक्षक रणधीर सिंग सेहरावत यांनी उत्तरार्धात जय भगवानला मॅटवर उतरवले. याचा संघाला फायदा झाला आणि जय भगवानने सुपर-१० लगावला. मात्र, त्याला इतर खेळाडूंची साथ मिळत नव्हती. दबंग दिल्लीसाठीही नवीन कुमार या सामन्यात खेळत नव्हता पण आशु मलिक आणि बचावपटूंनी मिळून त्याची भरपाई केली.

नितीन रावलने बेंगळुरू बुल्सच्या बचावात नक्कीच चांगली कामगिरी केली पण बाकीचे बचावपटू त्याला चांगली साथ देऊ शकले नाहीत. नितीन रावलने चमकदार कामगिरी करत हाय फाईव्ह मिळवला.

मात्र, उत्तरार्धात जय भगवानने जबरदस्त कामगिरी करत बेंगळुरू बुल्सला सामन्यात परत आणले. सामन्याची शेवटची दोन मिनिटे बाकी असताना बेंगळुरू बुल्सने दबंग दिल्लीला ऑलआऊट केले. याच कारणामुळे बुल्सला शेवटच्या क्षणी एका गुणाची आघाडी मिळाली.

अखेरच्या क्षणी बेंगळुरू बुल्सच्या बचावफळीनेही आश्चर्यकारक कामगिरी केली आणि त्यामुळे संघाला निर्णायक आघाडी मिळाली. शेवटी बुल्सने केवळ एका गुणाने सामना जिंकला.

Whats_app_banner